|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » leadingnews » भाजपाने ‘बेटी भगाओ’कार्यक्रम सुरू केला का ? -उद्धव ठाकरे

भाजपाने ‘बेटी भगाओ’कार्यक्रम सुरू केला का ? -उद्धव ठाकरे 

ऑनलाईन टीम / मुंबई :

लग्नासाठी मुली पळवून आणण्याची भाषा करणाऱया भाजपा आमदार राम कदमांवर सर्वच स्तरातून टीका होत असतांनाच विरोधकांनी राम कदमांच्या विधानावरून भाजपाला कोंडीत पकडण्याचा प्रयत्न चालवला आहे. त्यातच आता शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी राम कदमांच्या आडून भाजपावर शरसंधान केले आहे.

मुंबईत आयोजित प्रत्रकार परिषदेत ते म्हणाले, राम कदमांवर तात्काळ कारवाई झाली पाहिजे, यापुढे कोणत्याही पक्षानं त्यांना उमेदवारी देऊ नये, राम कदम, छिंदम आणि परिचारक हे एकाच माळेचे मणी आहेत. राम कदम, छिंदम आणि परिचारक यांना माफी देणे म्हणजे वाल्मिकींचा अपमान करण्यासारखे आहे. बेटी बचाव, बेटी पढावचा नारा बदलून भाजपाने आता बेटी भगाओचा नारा दिलेला दिसत आहे. मुख्यमंत्र्यांनी राम कदमांचा राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी राम कदम यांचा तातडीने राजीनामा घ्यावा, मुख्यमंत्र्यांनी कदमांवर धाडस दाखवून कारवाई करावी, असे उद्धव ठाकरे म्हणाले.

Related posts: