|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » Top News » अभिनेता संतोष जुवेकरविरोधात पुण्यात गुन्हा दाखल

अभिनेता संतोष जुवेकरविरोधात पुण्यात गुन्हा दाखल 

ऑनलाईन टीम / पुणे :

दहीहंडी उत्सवादरम्यान रहदारीस अडथळा केल्याप्रकरणी अभिनेता संतोष जुवेकरसह चौघांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुण्यातील सहकार नगर परिसरातील अरण्येश्वर चौकात अरण्येश्वर दहीहंडी उत्सव मंडळातर्फे दहीहंडीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी त्यांनी सार्वजनिक ठिकाणी पंचवीस बाय वीस लांब रस्त्याच्यामध्ये हंडी उभी केली होती.

या कार्यक्रमाला अभिनेता संतोष जुवेकर आला होता. त्यावेळी मोठय़ा आवाजात डॉल्बी लावून, प्रमाणापेक्षा अधिक मोठ्या आवाजात ध्वनिप्रदूषण झाल्याचं समोर आलं. यासह गर्दीमुळे रहदारीस अडथळा निर्माण झाला.

 

त्यावेळी आदेशाचा भंग केल्याने, पोलिसांनी हा कार्यक्रम बंद करण्यास सांगितलं. मात्र आयोजकांनी कार्यक्रम बंद करण्यास विरोध करुन, शासकीय कामात अडथळा निर्माण केल्याचा आरोप आहे. त्यामुळे सहकार नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Related posts: