|Friday, July 19, 2019
You are here: Home » विविधा » नेटीझन्सच्याही निशाण्यावर राम कदम

नेटीझन्सच्याही निशाण्यावर राम कदम 

ऑनलाईन टीम / मुंबई :

दहिहंडी उत्सवादरम्यान आमदार राम कदम यांनी केलेल्या वक्तव्याचे पडसाद राज्यात उमटले असून आता त्यांच्या या वक्तव्यावरून नेटीझन्सनेही राम कदमांना चांगलेच खडेबोल सुनावले आहेत.

तुम्हाला एखादी मुलगी पसंत असेल तर सांगा आपण तिला पळवून  तुम्हाला देऊ असे वक्तव्य राम कदम यांनी दहिहंडी उत्सवादरम्यान पेले होते. त्यांच्या या वक्तव्यावर विरोधकांनी त्यांना धारेवर धरले तसेच राज्यात ठिकठिकाणी राम कदमांविरोधात निदर्शने पहायला मिळाली. मात्र या प्रकरणातर राम कदम यांनी अजून कोणतीही माफी मागितलेली नाही किंवा पक्षाने देखील त्यांच्यावर कोणतीही कारवाई न केल्याने सोशल मीडियावर लोकांच आणखी संताप दिसत आहे. #हाकसलाराम हा हॅशटॅग वापरून लोक आपल्या प्रतिक्रिया व्यक्त करत आहे.