|Monday, July 22, 2019
You are here: Home » विशेष वृत्त » शिक्षकांच्या गावात प्रत्येक घरात शिक्षक

शिक्षकांच्या गावात प्रत्येक घरात शिक्षक 

ऑनलाइन टीम / गदग :

गदग जिल्हय़ामधील रोण तालुक्यातील हल्लूर हे गाव ‘शिक्षकांचे गाव’ म्हणून प्रसिद्ध असून, या गावाने राज्यापुढेच नव्हे; तर अवघ्या देशापुढे नवा आदर्श ठेवला आहे.

या गावाचे वैशिष्टय़ म्हणजे प्रत्येक घरातील एक व्यक्ती ही शिक्षकी पेशात असून, राज्यातील विविध भागांमधील शाळांमध्ये हे शिक्षक अध्यापनाचे काम करीत आहेत. तसेच कित्येकांची शिक्षक होण्याची इच्छा असून, त्यासंदर्भातील धडेही घेत आहे.

या गावची एकूण लोकसंख्या 12 हजार इतकी असून, त्यापैकी जवळपास 1 हजार 500 नागरिक हे शिक्षक आहेत. त्यामुळे हल्लूर हे खऱया अर्थाने शिक्षकांचे गाव ठरले आहे. आजच्या शिक्षकदिनी हल्लूर, तेथील नागरिकांचे शिक्षण अर्थात अध्यापनावरील प्रेम सर्वांसाठीच प्रेरणादायी म्हणता येईल.