|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » गरवारेतील सत्यनारायण पूजेने पुन्हा नव्या वादाला तोंड

गरवारेतील सत्यनारायण पूजेने पुन्हा नव्या वादाला तोंड 

पुणे / प्रतिनिधी

फर्ग्युसन महाविद्यालयातील सत्यनारायण पूजेचे प्रकरण ताजे असतानाच आबासाहेब गरवारे महाविद्यालयाने बुधवारी सत्यनारायण पूजेचे आयोजन केल्याने नव्या वादाला तोंड फुटले आहे.

दरम्यान, संस्थेने परवानगी दिल्यामुळे सत्यनारायणाची पूजा घालण्यात आल्याचे प्राचार्या मुक्तजा मटकरी यांनी सांगितले. गरवारे महाविद्यालयानेदेखील सत्यनारायण पूजेचे आयोजन केले होते. मात्र फर्ग्युसन महाविद्यालयातील पूजेला झालेला विरोध पाहून गरवारे महाविद्यालय प्रशासनाने ही पूजा रद्द केल्याचे जाहीर केले होते. एकंदरीत सत्यनारायण पूजेचा वाद निवळला असताना पुन्हा गरवारे महाविद्यालयाने आज सत्यनारायण पूजा घातली. याबाबत बोलताना गरवारेच्या प्राचार्या मुक्तजा मटकरी म्हणाल्या, आबासाहेब गरवारे महाविद्यालयात शिक्षकेतर कर्मचाऱयांची संघटना आहे. या संघटनेने 31 ऑगस्टला सत्यनारायण पूजेसाठी परवानगी मागितली होती. ती परवानगी संस्थेच्या पदाधिकाऱयांकडून मिळाली. त्यामुळे त्यांना पूजा घालण्यापासून रोखण्याचा प्रश्नच उद्भवत नाही.

Related posts: