|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » खंडाळा घाटात मालगाडीचा डब्बा घसरला

खंडाळा घाटात मालगाडीचा डब्बा घसरला 

ऑनलाईन टीम / लोणावळा

मुंबई-पुणे लोहमार्गावर खंडाळा बोगद्यात मालगाडीचा डब्बा घसरल्य?ाची घटना बुधवारी पहाटे पावणे पाच वाजण्याच्या सुमारास घडली. डाऊन मार्गावर घडलेल्या या अपघाताचा रेल्वे वाहतुकीवर कसलाही परिणाम झालेला नाही.

मिळालेल्या माहितीनुसार, पहाटे पावणेपाच वाजण्याच्या सुमारास मुंबईकडून पुण्याच्या दिशेने घाट चढून वर येणाऱया मालगाडीचा डब्बा खंडाळा बोगद्यात घसरला. या अपघाताचा वाहतुकीवर परिणाम झाला नसला, तरी वारंवार खंडाळा घाट परिसरात होणारे रेल्वेचे अपघात ही चिंतेची बाब असून, रेल्वे प्रशासनाने तातडीने हे अपघात रोखण्याकरिता प्रयत्न करण्याची आवश्यकता व्यक्त होत आहे.

Related posts: