|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » एअर इंडियाला सरकार देणार आर्थिक मदत

एअर इंडियाला सरकार देणार आर्थिक मदत 

6 वर्षात 26 हजार कोटींची दिली मदत

नवी दिल्ली :

 आपले आर्थिक संकट दूर करण्यासाठी एअर इंडिया सरकारकडून 2100 कोटी रुपयांची मदत घेणार आहे. हे विश्वासपूर्ण कर्जाच्या माध्यमातून देण्यात येणार आहे, अशी माहिती नागरिक उड्डाण विभागाचे सचिव आर एन चौबे यांनी दिली आहे.

अगोदरच 51 हजार कोटी रुपयाच्या कर्जात डबघाईला आलेल्या एअर इंडियाला आणखीन एक मदतीचा हात देण्यात येत आहे. मे महिन्यात सरकारकडून एअर इंडियाच्या मालकीची असणारी 76 टक्के हिस्सेदारी विकण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. परंतु  कोणीही खरेदी करणारे मिळाले नसल्याने ती सध्या जैसे थेच आहे.

बेलआऊट पॅकेजच्या मार्फत एअर इंडियाला जून पर्यत सरकारने 26 हजार कोटी दिले होते. 2012 मध्ये युपीए सरकार राहात पॅकेज देण्याची घोषणा केली होती. तर 2021 पर्यत कंपनीने नियमाचे पालन केल्यास सरकारकडून 30 हजार 231 कोटी रु. मिळू शकतात. पायलटनी व्यवस्थापन विभागाला पत्र लिहून जुलै महिन्यातील वेतन मिळण्यात विलंब झाला असून आतापर्यंत मागील पाच महिन्यापासून वेतन देण्यात उशीर होत असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. पायलट कर्मचाऱयानी आपल्या समस्या व्यवस्थापन विभागाला कळवल्या आहेत.