|Thursday, July 18, 2019
You are here: Home » उद्योग » ऍमेझॉनने गाठला 1 हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा

ऍमेझॉनने गाठला 1 हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा 

अमेरिकेतील दुसरी कंपनी  जगातील तिसऱया क्रमाकाची कंपनी ठरली

वृत्तसंस्था/ सॅन फ्रान्सिस्को

ऍमेझॉन कंपनीने आपला एक हजार अब्ज डॉलर्सचा टप्पा पार केला आहे. मार्केट कॅपमध्ये दुसरी अमेरिकेतील सर्वात मोठी कंपनी ठरली आहे. तर जगातील तिसऱया क्रमाकाची कंपनी म्हणून नोंद करण्यात आली आहे. मंगळवारी ऍमेझॉनच्या समभागात 2 टक्क्यांची तेजी सोबत 2050.50 डॉलर्सवर पोहोचली आहे. या वाढीसोबतच कंपनीने तिसऱया स्थानावर उडी घेतली आहे.

ऑगस्टमध्ये ऍपल कंपनी या अगोदर 1 हजार अब्ज डॉलर्स किंमतीची कंपनी ठरली आहे. तर 2007 मध्ये शांघाय शेअर बाजारात पेट्रोचयनाचे मार्केट मूल्ये आतच्या बाजार मूल्यापर्यत पोहोचले होते.

एक वर्षात शेअर्समध्ये 100 टक्क्याहून जादा वधारला आहे. तर मागील 12 महिन्यात ऍमेझॉनचे समभागानी 108 टक्के रिर्टन दिला आहे. या वर्षात जानेवारी  ते आता पर्यत 74 टक्के तेजी दिसून आली आहे. मागील तीन महिन्यात गुंतवणूक करण्यात आल्यावर 20 टक्क्यांचा नफा झाल्याची नोंद करण्यात आली आहे. तर एक महिन्या अगोदर 12 टक्क्यांची वाढ दिसून आली आहे.