|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » टाटा मोर्ट्सकडून नेक्सॉन क्रेझ भारतात सादर

टाटा मोर्ट्सकडून नेक्सॉन क्रेझ भारतात सादर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

टाटा मोर्ट्सकडून नेक्सॉन क्रेझ कारचे भारतात  सादरीकरण करण्यात आले आहे. या कारला एक वर्षपूर्ण झाल्यानंतर बाजारात उत्तरवली आहे. यात पेट्रोल आवृत्ती आणि डिझेल आवृत्तीचे यावेळी सादरीकरण करण्यात आले असल्याची माहिती कंपनीने दिली आहे.

पेट्रोल आवृत्तीची किमत 7.14 लाख रुपये असून डिझेल आवृत्तीची किमत 8.07 लाख रुपये ठेवण्यात आली आहे. या किमती एक्स शोरुमच्या असल्याचे स्पष्टीकरण देण्यात आले आहे. 4 हजार युनिट्सची विक्री करण्यात येणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले आहे. येत्या काळात ग्राहकांच्या पंसतीस ही कार उत्तरणार असल्याचा विश्वास यावेळी कंपनीच्या अधिकाऱयाकडून व्यक्त करण्यात आला आहे.