|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » एलआयसीची आयडीबीआयच्या हिस्सेदारीत वाढ

एलआयसीची आयडीबीआयच्या हिस्सेदारीत वाढ 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

भारतीय जीवन विमा (एलआयसी) आणि आयडीबीआय बँक यांच्यातील भागीदारीत वाढ करणार आहे. आयडीबीआय बँकेत आपली भागीदारी वाढवून ती 51 टक्क्यांपर्यत करण्याचा विचार मंगळवारी निर्देशक मंडळाच्या बैठकीत घेण्यात आल्याची माहिती एलआयसी कंपनीच्या अधिकाऱयांनी दिली.

एलआयसी खरेदी होणाऱया शअर्समधून आयडीबीआय बँकेची 7 टक्के भागिदारीची खरेदी करणार असून बँकेतील हिस्सेदारीत वाढ होऊन 14.9 टक्के, होणार आहे. जी आता 7.98 इतकी भागीदारी आहे.

या मदतीच्या आधारे आयडीबीआय बँकेला आपले व्यवहार करण्यासाठी मोठी मदत होणार आहे. तर यातून दुसऱया तिमाहीपर्यत बँकेला काटकसर करावी लागणार नसल्याचे स्पष्टीकरण यावेळी देण्यात आले. ऑगस्टमध्ये केंद्रीयमंत्रिमंडळाने आयडीबीआय बँकेतील हिस्सेदारी वाढ करुन ती 51 टक्के करण्यासाठी मंजुरी दिली आहे. तर आयडीबीआय बँकेत सरकारची एकूण हिस्सेदारी 85.96 टक्के आहे.