|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » भारतात ‘ऑनर 7 एस’ सादर

भारतात ‘ऑनर 7 एस’ सादर 

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हुआईच्या सर्वात मोठय़ा बँण्डने ‘ऑनर 7 एस’ या स्मार्टफोनचे भारतात सादरीकरण करण्यात आले आहे. या फोनमध्ये 18.9 इंच डिस्प्ले आणि 5 मेगापिस्मकल सेल्फी कॅमेरा व 3020 एमएएच बॅटरी अशा सुविधा देण्यात येणार आहेत.

भारतात या स्मार्टफोनची किंमत

कंपनीकडून भारतात एका डिझाईनचे सादरीकरण करण्यात आले आहे. यात 2 जीबी रॅम आणि 16 जीबी क्षमता असणारी मेमरी मिळणार आहे. तर यांची सादरीकरणा वेळेची किमत 6 हजार 999 रुपये ठेवण्यात आली आहे. स्मार्टफोन विक्रीकरिता ग्राहकांना फ्लिपकार्टच्या वेबसाईट उपलब्ध करुन देण्यात येणार असून याची प्रथम विक्री 14 सप्टेबर ला दुपारी 12 वा. चालू करण्यात येणार आहे.

डिस्प्ले :5.45 इंच एचडी

रॅम : 2 जीबी

बॅटरी : 3020 एमएएच

कॅमेरा :13 एमपी

फ्रन्ट कॅमेरा         : 5 एमपी