|Tuesday, July 23, 2019
You are here: Home » आवृत्ती » रत्नागिरी » तालुका क्रीडा अधिकारीपदी अंकिता मयेकरचा थेट निवड

तालुका क्रीडा अधिकारीपदी अंकिता मयेकरचा थेट निवड 

प्रतिनिधी /रत्नागिरी

महसूल खात्यातील अधिकारी, कर्मचारी यांचे पाठबळ, प्रशिक्षकांचे मार्गदर्शन, माहेर-सासरचा पूर्ण पाठिंबा यामुळे 2015 च्या हाँगकाँग आशियाई स्पर्धेत रजत पदक मिळू शकले. त्यामुळेच तालुका क्रीडा अधिकारी म्हणून थेट निवड होऊ शकली, अशा भावना रत्नागिरीची सुकन्या अंकिता मयेकर- पिलणकर यांनी व्यक्त केली. राज्य शासनाकडून नुकतीच त्यांची तालुका क्रीडा अधिकारी म्हणून थेट निवड झाल्याच्या पार्श्वभूमीवर ‘तरुण भारत’शी त्या बोलत होत्या.

राज्य सरकारचा 5 सप्टेंबर रोजी शासन निर्णय जारी झाला. यानुसार राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय स्तरावर नैपूण्य मिळवणाऱया क्रीडापटुंना थेट शासनसेवेत घेण्याविषयी निर्णय झाला. राज्यातील उत्कृष्ट खेळाडूंना पोलीस उपअधिक्षक, नायब तहसिलदार, तालुका क्रीडाधिकारी, लिपिक अशा पदांवर थेट नियुक्ती देण्यात आली. यामध्ये दिव्यांग खेळाडूंनाही थेट नियुक्ती देण्यात आली आहे. त्यामध्ये पॉवरलिफ्टींगमधून अंकिता मयेकर-पिलणकर यांची निवड तालुका क्रीडाधिकारी म्हणून शासनाने केली आहे.

त्या म्हणाल्या 2010 साली गोगटे जोगळेकर महाविद्यालयातून बी.ए. ही पदवी घेतली. त्यापूर्वी 2008 सालापासून योगा व Hee@Jejefueefफ्टींगमध्ये सातत्याने पॅटिक्स सुरु होती.. वेगवेगळ्या स्पर्धांमधून यश मिळत गेले. 2012 साली सामाजिक शास्त्र या विषयात एम.ए. झाल्यानंतर जिल्हाधिकारी कार्यालयात पुरवठा शाखेत चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून भरती झाली. पुढे लिपीक म्हणून पदोन्नती मिळाली.

2015 साली हाँगकाँगला पॉवरलिफ्टींगसाठी आशियाई स्पर्धेत भारताचे प्रतिनिधीत्व करण्याची संधी मिळाली. त्यासाठी दीड लाख रुपये रक्कम भरणे आवश्यक होते. जिल्हाधिकारी कार्यालयातील सर्वच लोकांनी या कामी मदत केली. त्यामुळे स्पर्धेत सहभागी होता आले. तेथे रजत पदक मिळाले. सुरुवातीपासून कॉलेजचे मदन भास्करे सर व राज नेवरेकर यांनी विशेष मार्गदर्शन केले असे त्या म्हणाल्या.

त्यांचे वडिल अशोक मयेकर हे शासकीय तंत्रनिकेतनमध्ये चतुर्थश्रेणी कर्मचारी म्हणून काम करतात. त्यांचे माहेर रत्नागिरी तालुक्यातील बसणी येथे आहे. आई आश्विनी यांचा पॉवरलिफ्टींगसाठी मोठा पाठिंबा मिळाला व अजूनही आहे. त्यांचे सासर रायगड जिह्यात आहे. पती विनय पिलणकर हे वडखळ येथे जे.एस.डब्ल्यू कारखान्यात काम करत आहेत. माहेरच्या लोकांसोबत पती व सासरे यांचा क्रीडा क्षेत्रात काम करण्यासाठी जोरदार पाठिंबा आहे यामुळेच पॉवरलिफ्टींगमध्ये काही करणे शक्य झाले, अशा भावना अंकिता मयेकर-पिलणकर यांनी व्यक्त केल्या. या निवडीबद्दल अंकिता मयेकर यांचे कौतुक होत आहे. या नियुक्तीमुळे जिह्यातील क्रीडाक्षेत्रातालाही चालना मिळण्याची अपेक्षा व्यक्त होत आहे.