|Saturday, July 20, 2019
You are here: Home » उद्योग » सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरणीचे सत्र चालूच

सेन्सेक्स, निफ्टीमध्ये घसरणीचे सत्र चालूच 

निफ्टी 11,500 च्या खाली, सेन्सेक्स 140 अंकावर बंद

प्रतिनिधी/मुंबई

बाजारात रुपायांच्या कमजोरीच्या दबावात खरेदी होत दिवसभरातील व्यवहार रिकव्हर होत बंद झालेत. मुंबई शेअर बाजारात जवळपास 250 अंकाची रिकव्हरी झाल्याचे दिसून आले. तर सेन्सेक्सने 38,000 हजारचा टप्पा पार करण्यात मजल मारली. तर दुसरीकडे निफ्टी 11,400 च्या खाली घसरला होता.

मिडकॅप आणि स्मॉलकॅपचा निर्देशाकात खालच्या पातळीवर चांगली विक्री झाल्याचे दिसून आले. तर बीएसईचा मिडकॅपचा निर्देशाक 0.6 टक्क्यांनी घरसणीसह तो 16,267.4 वर पोहोचत बंद झाला. निफ्टीचा मिडकॅप 100 निर्देशाक 0.5 टक्क्यांच्या कमजोरी बरोबर 19,245.5 पातळीवर पोहोचत बंद झाला आहे. स्मॉलकॅपचा निर्देशाक 16,533 वर स्थिर झाला.

बीएसईच्या मुख्य 30 शअर्सचा निर्देशाकात सेन्सेक्स 140 अंकानी म्हणजे 0.4 टक्के घसरण नोंदवत तो 38,018 पर्यत जात बंद झाला आहे. तर एनएसईच्या 50 शेअर्सचा निर्देशाकात निफ्टी 43 अंकानी म्हणजे 0.4 टक्के कमजोरी सोबत बंद झाला आहे.

 दिसेंदिवस रुपायात होत असणारी घसरण आणि भारतीय बाजारात खरेदी विक्रीत होत असणारी चढ उतारा यांच्या वर होत असणारा परिणाम दिसून येत आहे. यगच सोबत आंतरराष्ट्रीय बाजारात मंगळवारी ऍमेझॉन कंपनी सर्वात जादा मार्केट मूल्ये असणारी जगातील तिसऱया क्रमाकांची कंपनी ठरली असून ऍमेझॉनच्या समभाची उच्चांकी खरेदी झाल्याचे दिसून आले आहे.

बुधवारी एफएमसीजी , माध्यम, आर्थिक सेवा, ऑईल आणि गॅस या कंपन्याच्या समभागांची समाधानकारक विक्री झाली. तर बँक निफ्टीत 0.2 टक्के घसरणीसह ती 27,376 वर पोहोचली आहे. धातू, औषध आणि ऑटो या कंपन्याच्या समभागाची विक्री झाल्याचे दिसून आले.

दिग्गज शेअर्समध्ये भारती इंन्प्राटेल, एचयुएल , टायटन , भारती एअरटेल, कोटक महिंद्रा बँक, रिलायन्स इंडस्ट्रीज आणि हीरोमोटो यांचे समभाग 4.5 ते 1 टक्क्यांनी घसरलेत. दुसरीकडे येस बँक वेदान्ता, हिडाल्को, विप्रो, टाटा मोटर्स, अदानी पोर्ट्स, विप्रो आणि सनफार्मा या कंपन्याचे समभाग 3 ते 1.4 टक्क्यांनी उसळी घेत बंद झालेत.