|Tuesday, November 20, 2018
You are here: Home » आवृत्ती » सांगली » घरकुल उभारणीचा सोलापूर पॅटर्न

घरकुल उभारणीचा सोलापूर पॅटर्न 

प्रतिनिधी/ सोलापूर

केंद्र व राज्य पुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेच्या माध्यमातून सोलापूर जिह्यामध्ये तब्ब्ल 10 हजार 499 घरकुले उभारण्यात आली असून, राज्यात घरकुल उभारणीत सोलापुरचा पॅटर्न नावारुपाला आला आहे. त्याचीच पोहोच म्हणून केंद्र सरकार पुरस्कृत प्रधानमंत्री घरकुल आवास योजनेत जिल्हा राज्यात चौथ्या तर राज्य सरकार पुरस्कृत घरकुल योजनेत जिह्याने दुसरा क्रमांक पटकावला आहे.

 प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत ऑगस्टअखेर जिल्हा परिषदेच्या ग्रामीण विकास  यंत्रणेच्या राज्यस्तरीय कार्यक्रमात विशेष सत्कार करण्यात आला. ग्रामीण विकास यंत्रणेने पंतप्रधान आवास योजनेतून 1048 तर राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेतून 3709 घरकुले उभारली आहेत.

  याबाबत जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणेचे प्रकरण संचालक अनिलकुमार नवाळे यांनी माहिती दिली. त्यांनी सांगितले की, ‘पंतप्रधान आवास योजनेत सोलापूर जिल्हा चौथ्या क्रमांकावर आहे. राज्य पुरस्कृत ग्रामीण घरकुल योजनेत सोलापूर जिल्हा राज्यात दुसऱया क्रमांकावर आहे. जिह्याच्या या कामगिरीत सांगोला पंचायत समिती आणि माळशिरस पंचायत समितीने सांगितले. सांगोला पंचायत समितीने 1629 आणि माळशिरसने 1626 घरकुले उभारली आहेत. पुर्ण घरकुलांच्या संख्येत राज्यात माळशिरस पंचायत समिती  दुसऱया क्रमांकावर आहे. गेल्या दोन वर्षात पंचायत समितीने रमाई, पारधी घरकुल योजनेत 513 घरकुले पूर्ण केली आहेत. उत्तर सोलापूर पंचायत समिती  सहाव्या आणि करमाळा पंचायत समिती आठव्या क्रमांकावर आहे. त्यांनी अनूक्रमे 441 आणि 415 घरकुले उभारली.

  जिह्याच्या कामगिरीबद्दल नवी मुंबई येथे झालेल्या कार्यक्रमात राज्याचे मुख्य सचिव डी.के. जैन आणि ग्रामविकास विभाग सचिव असिम गूप्ता, राज्य व्यवस्थापन कक्षाचे संचालक धनंजय माळी यांच्या हस्ते नवाळे यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी सांगोला गटविकास अधिकारी संतोष राऊत आणि माळशिरस गटविकास अधिकारी अमोल ताकभाते यांचाही सत्कार करण्यात आला.            

  ग्रामीण विकास यंत्रणेक्च्या कामकाजाबद्दल जिल्हा परिषद अध्यक्ष संजय शिंदे, मूख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र भारुड, उपाध्यक्ष शिवानंद पाटील यांनीही अभिनंदन केले आहे.

Related posts: