|Monday, November 12, 2018
You are here: Home » आवृत्ती » सातारा » ग्रेड सेपरेटरवरून पादचारी मार्ग सुरू

ग्रेड सेपरेटरवरून पादचारी मार्ग सुरू 

पादचाऱयांचा त्रास होणार कमी, दुभागलेला भाग पुन्हा जोडला गेल्याने नागरिकांमध्ये समाधान

प्रतिनिधी/ सातारा

गेल्या अनेक दिवसांपासून सुरू असलेल्या ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शहरातील वाहतुकीवर ताण निर्माण होत होता. यामुळे वाहनांबरोबरच पादचाऱयांना या
ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे त्रास सहन करावा लागत होता. मंगळवारी सायंकाळी पोवईनाक्यारील गेड सेपरेटरच्या स्लॅबवर भराव टाकून पादचारी मार्ग सुरू करण्यात आला असल्याने पादचाऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे.

गुढीपाडव्याला गेड सेपरेटर या कामाची सुरूवात करण्यात आली. शहरातील  वाहतुक कोंडी टाळण्यासाठी गेड सेपरेटर तयार करण्यात येत आहे.
गेड सेपरेटरच्याकामामुळे शहराचे दोन भाग झाले होते. यामुळे वाहनधारकांना तसेच पादचाऱयांना लांब पल्ल्याचे अंतर पार करावे लागत होते. गणेशोत्सवात शहरातील वाहतुकीवर मोठय़ा प्रमाणात ताण निर्माण होत असतो. पादचाऱयांच्या गर्दी बरोबरच वाहनधारकांची देखील गर्दी होत असते. यामुळे गणशोत्सवापूर्वी नाक्यावरील दोन भागांच्या एकीकरणाचे काम मंगळवारी सायंकाळी करण्यात आले. स्लॅबवर भराव टाकून तो उंचवण्यात आला आहे. यामुळे पादचाऱयांचे चालण्याचे अंतर आता कमी झाल्याने पादचाऱयांमधून समाधान व्यक्त होत आहे. तसेच हा रस्ता लवकरच वाहतुकीसाठी देखील खुला करण्यात येणार आहे.

वाहतुकीस अडथळा होणारा कट्टा हटविण्यात अखेर पालिकेला यश

पोवई नाक्यावरील जुन्या कालिदास पेट्रोल पंपाचा वाहतूकीस अडथळा होणारा कट्टा हटविण्यात अखेर बुधवारी पालिकेला यश आले. तीन वर्षांपूर्वी हा पंप तेथून हटविण्यात आला आहे. तथापि, कट्टय़ाने जागा अडवून धरली होती.  

जेसीबीने कारवाई 

जेसीबीने बुधवारी पूर्वीच्या पेट्रोलपंपाचा कट्टा हटवून पालिकेने जागा रस्ता रुंदीकरणासाठी ताब्यात घेतली. या जागेवर तात्पुरता मुरुम टाकून रुंदीकरण करण्यात येणार आहे. सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता रुंदीकरणामध्ये अडथळा ठरत असल्याने तीन वर्षांपूर्वी या पंपाचे बांधकाम पाडले होते. त्या दिवसापासून पंप बंद आहे. मात्र, त्याच्या दारातील कट्टा तसाच होता. त्यामुळे रहदारीसाठी ही जागा वापरात येत नव्हती. ग्रेड सेपरेटरच्या कामामुळे शिवाजी सर्कल ते पोलीस कवायत मैदान हा रस्ता कालिदास पंपाजवळ अधिकच अरुंद झाला आहे. त्यामुळे कट्टा पाडून रुंदीकरण करणे गरजेचे होते. 

गेल्या आठवडय़ात जागा ताब्यात घेण्यासाठी पोवई नाक्यावर गेलेले पालिकेचे अतिक्रमण विरोधी पथक कालिदास पंपाच्या जागेवर जाऊन थबकले होते. बुधवारी पुन्हा या पथकाने डिप्लोमॅसी करत चर्चेअंती जागा ताब्यात घेतली. जेसीबीच्या सहाय्याने कट्टा हटविण्यात आला. याठिकाणी सध्याचा रस्ता सहा मिटर रुंदीचा असून रुंदीकरणानंतर तो 20 मीटर रुंद होईल, असे पालिकेच्या सूत्रांनी सांगितले. ही कार्यवाही भाग निरीक्षक सतीश साखरे, अतिक्रमण विभाग निरीक्षक प्रशांत निकम व शैलेश अष्टेकर यांनी केली.

Related posts: