|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » डंपरला भीषण आग

डंपरला भीषण आग 

प्रतिनिधी/ म्हसवड

सातारा-पंढरपूर  महामार्गाच्या सुरू असणाऱया कामावर बुधवारी सायंकाळी रस्त्यावर मुरूम टाकणाऱया डंपरचा उच्च वीजवाहक तारेला स्पर्श होऊन झालेल्या स्पर्किंगमुळे डंपरने पेट घेतला. यात डंपरचे नुकसान झाले. मात्र धाडसी युवकांनी पेटलेला डंपर जीव धोक्यात घालून वि झवला म्हसवड पालिकेच्या अग्निशमनच्या सहाय्याने आग आटोक्यात आणण्यात यश आले. यामुळे मोठी दुर्घटना टळली.

सातारा पंढरपूर या हा मार्गाचे हायवेच्या महामार्गात रूपांतर झाल्याने मेल कंपनी मार्फत सातारा ते पंढरपूर रस्त्यावर सर्वत्र मोठय़ा प्रमाणात कामे सुरु आहेत. गोंदवले खुर्द मध्ये सातारा येतील सागर पाटील, दीपक ढवळे, शशिकांत पवार, हे या कामावर ठेकेदार असून ठेकेदारांच्या   निष्काळजीपणाने अनेक वेळा दुर्दैवी दुर्घटना होता होता राहिल्या आहेत. सायंकाळी साडेपाचला सुनिता मंगल कार्यालय व वनराज ढाब्यासमोर रस्त्यावर नवीन क्रॉंकिटीकरण करण्यात आलेल्या भागाच्या साईडपट्टीला मुरूम भरण्याचे काम सुरू होते.डंपरद्वारे मुरुम ओतला जात होता. डंपर चालक जाधव हे मुरूम घेऊन आले. आल्यावर त्याने मुख्य रस्त्यावर गाडी चढवली आणि मुरूम ओतण्यास सुरुवात करण्यासाठी डंपर उचलायला सुरुवात केली. त्यावेळी हॉटेल सायली येथे काही लोक चहा पिण्यासाठी थांबले होते. त्यांनी हे दृश्य पाहिले व वर तारा आहेत डंपर उचलू नका असे ओरडून सांगितले. मात्र त्याला आवाज ऐकू आला नाही, त्याने डंपरचा हौदा वर उचलला आणि त्यातील काही मुरूम खाली पडला. सगळा मुरूम पाडण्यासाठी त्याने डंपरला जोरात झटका दिला व त्याचे वरचे लोखंडी टोक गोंदवल विद्युत तारेला चिकटले. त्यावर ते अडकून राहिले व त्याच्या ठिकाणी ठिणग्या पडायला सुरुवात झाली.

घाबरून चालकाने वरून उडी मारली व तो बाजूला झाला. त्या ठिणग्यामुळे टायरने व ऑईलने जोरात पेट घेतला. डंपरच्या डाव्या बाजूच्या टायरने पेट घेतल्याने चार टायर पूर्ण पेटले. यावेळी सर्व वाहने जागच्या जागी थांबली होती. ही आग वाऱयाने डिझेल टाकीच्या दिशेने मोठय़ा प्रमाणात भडकू लागली मात्र डंपर चालक जाधव, किरण शेडगे, सुनील माने, गणेश नवगण, प्रवीण अवघडे, असिफ मुल्ला, गणेश वायदंडे, कुमार वायदंडे या धाडशी युवकांनी कोणतीही पर्वा न करता पाणी आणून जीव धोक्यात घालून टायर वर पाणी मारण्यास सुरुवात केली व आग विझवली.

Related posts: