|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » वॉव, अमेझिंग.!

वॉव, अमेझिंग.! 

प्रतिनिधी/ सातारा

सातारा तालुक्यातील कुमठे बीटाचा ज्ञानरचनावाद हा जगाच्या कानाकोपऱयापर्यंत पोहचला आहे. आजही हा ज्ञानरचनावाद आहे की, नाही याची माहिती घेण्यासाठी शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्या सौभाग्यवती सौ. वर्षा तावडे यांनी शिवाजीनगर शाळेला भेट दिली. विद्यार्थ्याच्या तोंडून इंग्रजीचे वाचन पाहून त्या क्षणभर थक्क झाल्या. त्यांच्या तोंडून ‘वाव अमेझिंग’ असे आश्चर्यकारक उद्गारही काढले.

राज्यस्तरीय आदर्श पुरस्कार वितरण सोहळय़ाच्या निमित्ताने साताऱयात शिक्षणमंत्री विनोद तावडे हे आले होते. ते इकडे पुरस्कार वितरण सोहळय़ात मग्न असताना त्यांच्या सौभाग्यवती सौ. वर्षा विनोद तावडे यांनी सातारा तालुक्यातील कुमठे बिटातील शिवाजीनगर शाळेला भेट दिली. तेथे भेट दिल्यानंतर त्यांचे स्वागत विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांनी केले. त्यांनी पहिल्याच्या विद्यार्थ्यांकडून इंग्रजीचे वाचन फाडफाड झाल्याचे पाहून त्या थक्क झाल्या. शिक्षकांकडून विद्यार्थ्यांना शिकवण्याची पद्धत पाहून त्यांच्या तोंडून चक्क ‘वॉव अमेझिंग’, असे उद्गार बाहेर पडले. त्यांनी विद्यार्थ्यांचे ज्ञानार्जन पाहून त्यांनी शिक्षक व विस्तार अधिकारी प्रतिभा भराडे यांचे कौतुक केले. याप्रसंगी वर्षा तावडे म्हणाल्या, कुमठे बिटातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीसाठी सर्वतोपरी मदत केली जाईल, असे सांगितले.

Related posts: