|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » विसावा नाक्यावर आरोग्य पथक दाखल

विसावा नाक्यावर आरोग्य पथक दाखल 

विसावानाका परिसरात 25 जणांना काविळीची लागण, वैद्यकीय अधिकाऱयांनी केली पाहणी

प्रतिनिधी/ सातारा

येथील विसावानाका या भागात गेल्या दीड महिन्यांपासून प्रधिकरणाकडून अशुद्ध पाणी पुरवठा होत असल्याने काविळीची साथ पसरली आहे. या परिसरातील 25 जणांना काविळीची लागण झाली आहे. प्राधिकरणातर्फे आरोग्य अधिकारी, कर्मचारी यांनी तपासणी सुरू केली आहे.

प्राधिकरणाचे साफ दुर्लक्ष

विसावानाकानजीक माने हॉस्पिटलच्या पाठीमागील बाजूस काही बंगल्यांसह मानसी डुप्लेक्स, महावीर अपार्टमेंटसह अनेक घरे आहेत. हा भाग पालिकेच्या हद्दीत येतो. महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाच्या माध्यामातून तेथे पाणीपुरवठा करण्यात येतो. या भागात गेल्या दीड महिन्यांपासून दुषित पाणीपुरवठा सुरू आहे. येथील सर्व पाईपलाईनला गळती लागली आहे. मात्र, ही गळती काढायला प्राधिकरणाकडे वेळ उरला नाही. याचा परिणाम दुषित पाणी पिल्याने कावीळची लागण झाली आहे. त्यामुळे किमान एक तरी व्यक्ती आजारी आहे. तसेच काहींना कावीळ झाल्याचे समोर आले असून या भागात 25 जणांना याची लागण झाली आहे. यामुळे प्राधिकरणानाकडून आरोग्य अधिकारी व कर्मचारी यांनी या भागातील घरोघरी जावून पाण्याची तपासणी केली आहे. मात्र ही काविळीची साथ पसरण्याची वेळ आली नसती जर प्राधिकरणाने नागरिकांच्या वारंवार येणाऱया तक्रारींकडे दुर्लक्ष केले नसते. अशी प्रतिक्रिया येथील नागरिकांच्यातून होत आहे.

प्राधिकरणाचे केवळ दुर्लक्ष…

विसावानाका परिसरात गेल्या अनेक दिवसांपासून पाईपलाईनला गळती लागली आहे. हे सर्व नागरिकांनी प्राधिकरणाच्या निदर्शनास आणून दिले होते. तसेच वारंवार तक्रारी करून कोणतीही दखल घेतली जात नाही. तसेच उडावाउडवीची उत्तरे दिली जातात. यामुळे पाणी दुषित असून देखील त्याचा वापर करण्याशिवाय पर्याय उरला नाही. यांचा परिणाम म्हणून आज 25 जण आजारी आहेत.

Related posts: