|Tuesday, July 16, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » आदर्श पुरस्कार सोहळा रंगतदार

आदर्श पुरस्कार सोहळा रंगतदार 

शिक्षक म्हणजे प्रेमांचा झरा  अभिनेते पुष्कर श्रोत्री, भरत जाधव, आदेश बांदेकर यांनी मांडले मत

प्रतिनिधी/ सातारा

गुणिले, भागिले.. सांगा माहिती.. वर्गात जे शिकवले.. तेच लिहिले, असे गाणे अभिनेता भरत जाधव यांनी, तर हिच आमची प्रार्थना.. हेच आमचे मागणे..माणसाने माणसासारखे वागणे, अशी पुष्कर श्रोत्रींची प्रार्थना, शिक्षकांनी शिक्षण विभागाला लिहिलेले पत्र, राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळय़ातील कार्यक्रमांमध्ये रंगत आणली ती अभिनेत्यांची अभिनेत्यांनी घेतल्या प्रकट मुलाखतीत. आपले शिक्षक हे प्रेमाचा झराच होते, अशीही भावना त्यांनी व्यक्त केली.

जिल्हा परिषदेच्या बहुउद्देशीय सभागृहात झालेल्या राज्यस्तरीय आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळय़ामध्ये सेलिब्रिटी म्हणून अभिनेते पुष्कर श्रोत्री, आदेश बांदेकर आणि भरत जाधव यांच्या मुलाखतीचा कार्यक्रम पार पडला. त्यामध्ये पुष्कर श्रोत्री यांनी सुरुवातीला दोघांची मुलाखत घेतली. नंतर आदेश बांदेकर यांनी पुष्कर श्रोत्री यांची मुलाखत घेतली. त्यामध्ये आदेश बांदेकर म्हणाले, माझे शिक्षण मराठी माध्यमांच्या शाळेत पहिली ते दहावीपर्यंत झाले. एकाच वर्गात कधीही थांबलो नाही. शिक्षकांनी संस्कार दिले. पवार सर आणि उपाध्ये सरांनी घडवले. आम्ही गिरणगावात राहणारे. आई-वडील कधी यायचे हे समजायचे नाही, असे सांगितले. तर भरत जाधव म्हणाले, माझ्यासाठी शिक्षक म्हणजे हिटलर होते. त्यांच्यामुळे माझ्यात धाडस आले. प्रश्नाला उत्तर मी द्यायचो ते माझ्या पद्धतीने. माझं आणि इंग्रजीचं वाकडंच. शिक्षण म्युन्सिपल स्कूलमधून झाले. एकदा डेंजर शब्द उच्चारण्याऐवजी धनगर हा शब्द उच्चारताच खड्डू फेकून मारला. तेव्हापासून व्हाट, व्हेअर, हाव हे शब्दच पाठ करुन ठेवले. अमेरिकेत जाण्यापूर्वी व्हिसा काढायचा होता. प्रश्नांमध्ये हिच उत्तरे दिली लगेच व्हिसा मिळाला, असेही त्यांनी सांगितले. शिक्षकाने शिक्षण विभागाला लिहिलेले पत्र पुष्कर श्रोत्री यांनी वाचून दाखवले. सूत्रसंचालन स्नेहल दामले, अभय देवरे यांनी केले.