|Friday, July 19, 2019
You are here: Home » Top News » 5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोची एक्स्प्रेस वेवर धडक

5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोची एक्स्प्रेस वेवर धडक 

ऑनलाईन टीम / मुंबई

मुंबई-पुणे एक्स्प्रेस वेवर विचित्र अपघात झाला आहे. बोरघाटात दोन वेगवेगळय़ा अपघातात एकाचा मृत्यू झाला आहे. या अपघातात 10 गाडय़ांची एकमेकांना धडक झाली. यात ट्रक चालकाचा मृत्यू झाला.

5 कार, 4 ट्रक आणि एका टेम्पोची एकमेकांना धडक झाली. तर दुसऱया अपघातात एकूण 8 गाडय़ा धडकल्या आहेत. मुंबई- पुणे एक्स्प्रेसवेवर बोरघाटात हे अपघात झाले. खोपोलीनजीक ट्रकची कंटेनर टेलरला धडक झाली. यामध्ये चालक गंभीर जखमी झाला. तर दुसऱया अपघातात चार गाडय़ांची एकमेकांना धडक बसली. त्यानंतर दोन कार आणि दोन ट्रकची धडक झाली. मुंबईकडे येणाऱया मार्गावर हा विचित्र अपघात झाल्याने वाहतूक विस्कळीत झाली आहे. हा अपघात कशामुळे झाला, अपघाताला कोण कारणीभूत होते? कोणाची चूक होती, हे आता पोलिसांच्या चौकशीनंतर कळू शकेल. मात्र असा विचित्र अपघात होऊन तब्बल दहा गाडय़ा एकमेकांना धडकल्याने सर्वत्र चर्चेचा विषय सुरु आहे. एक्स्प्रेस वेवर सर्वच वाहनांचा वेग सुसाट असतो. त्यामुळे ऐनवेळी वेगावर नियंत्रण मिळवणे कठीण असते.