|Wednesday, September 19, 2018
You are here: Home » Top News » राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाकडून एकाची हत्या

राष्ट्रवादीच्या तालुका अध्यक्षाकडून एकाची हत्या 

ऑनलाईन टीम / सांगली :

सांगलीत निवडणुकीतील वादातून युवक राष्ट्रवादीच्या अध्यक्षाने अनुसूचित जातीतील एका व्यक्तीची हत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. तासगाव तालुक्मयातील वायफळे येथे ही घटना घडली आहे. राजेश फाळके असे मृत व्यक्तीचे नाव असून, बेदम मारहाणीत त्याचा मृत्यू झाला आहे. याप्रकरणी राष्ट्रवादी तासगाव तालुकाध्यक्षावर तासगाव पोलीस ठाण्यात हत्येचा गुन्हा दाखल झाला आहे.

बुधवारी रात्री ग्रामपंचायत निवडणुकीच्या वादातून राजेश पाटील आणि राजेश फाळके यांच्यात जोरदार वादावादी झाली. निवडणुकीत अनुसूचित समाजातील मते पडली नाहीत यावरून या वादाला तोंड फुटले. याच रागातून पाटीलने फाळकेला बेदम मारहाण केली. या मारहाणीत फाळके गंभीर जखमी झाला. जखमी राजेश फाळकेला सांगलीच्या जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. याप्रकरणी युवक राष्ट्रवादी तासगाव तालुकाध्यक्ष राजेश पाटील विरोधात ऍट्रॉसिटी व खून असे दोन गंभीर गुन्हे दाखल दाखल करण्यात आले आहेत. दरम्यान जोपर्यंत आरोपी राजेश पाटीलला अटक होत नाही, तोपर्यंत मृतदेह ताब्यात घेणार नाही, अशी आक्रमक भूमिका राजेश फाळकेच्या कुटुंबियांनी घेतली. सांगली सामान्य रुग्णालयासमोर राजेश फाळकेच्या नातेवाइकांनी मोठी गर्दी केली. या खूनाच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन समाजाकडून आणि इतर संघटनांकडून वायफळे आणि तासगाव तालुक्मयात बंद पुकारण्यात आला आहे.

Related posts: