|Monday, November 19, 2018
You are here: Home » Top News » दाभोळकर हत्याप्रकरण : तपास यंत्रणांना कोर्टाने फटकारले

दाभोळकर हत्याप्रकरण : तपास यंत्रणांना कोर्टाने फटकारले 

ऑनलाईन टीम / मुंबई :

डॉ. नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसरे हत्येप्रकरणी आज मुंबई हायकोर्टात सुनावणी झाली आहे. या हत्येसंबंधी सतत माध्यमांसमोर येवून भाष्य करणाऱया तपास यंत्रणांची चांगलीच कानउघाडणी मुंबई हायकोर्टाने केली आहे. तपास अधिकाऱयांनी माध्यमांसमोर पुरावे उघड करणे हे आम्हाला पसंत नाही, अशा शब्दांत हायकोर्टाने त्यांना फटकारले आहे.

दाभोलकर-पानसरे यांच्या हत्येप्रकरणी कोर्टात सुनावणी सुरू असताना विशेष तपास पथक (एसआयटी) सतत माध्यमांसमोर का जात आहे. हे योग्य नाही, अशा शब्दांत मुंबई हायकोर्टाने तपास यंत्रणांना खडे बोल सुनावले. इतर तपास यंत्रणांवर अवलंबून राहू नका, तुमचा स्वतंत्र तपास सुरू ठेवा, असे निर्देश कॉ. गोविंत पानसरे यांच्या हत्येचा तपास करणाऱया एसआयटीला हायकोर्टाने दिले. तपास यंत्रणांची कान उघाडणी करताना कोर्टाने दाभोलकर-पानसरे कुटुंबियांनाही खडसावले आहे. या दोन्ही कुटुंबीयांनी अभिव्यक्ती स्वातंत्र्यांचा गैरफायदा घेवू नये, माध्यमांसमोर जावून या प्रकरणाचे पुरावे उघड करू नये, अशी समज त्यांना दिली. दरम्यान, दाभोलकर हत्या प्रकरणाच्या सुनावणीला 10 ऑक्टोबरपर्यंत हायकोर्टाने स्थगिती दिली आहे.

Related posts: