|Monday, April 22, 2019
You are here: Home » Top News » मुद्रण व्यवसाय संकटात ; 30 टक्के भाववाढ करा ; पूना प्रेसचे आवाहन

मुद्रण व्यवसाय संकटात ; 30 टक्के भाववाढ करा ; पूना प्रेसचे आवाहन 

ऑनलाईन टीम / पुणे

पेपर, शाई, मुद्रण साहित्य यांच्या किमतीमध्ये झालेली भरमसाठ वाढ, कुशल कामगारांसाठी होणारा मोठय़ा प्रमाणातील खर्च याचबरोबरीने मुद्रण क्षेत्राबाबत शासनाची उदासीन भूमिका या महत्त्वाच्या बाबींमुळे सध्याचे मुद्रण क्षेत्र हे मोठय़ा प्रमाणात अडचणीचा सामना करत आहे. यामुळे मुद्रण व्यवसायिकांनी आपल्या दरांमध्ये किमान 30 टक्के भाववाढ करावी, असे आवाहन दि. पूना प्रेस ओनर्स असोसिएशन लि.चे अध्यक्ष रवींद्र जोशी यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत केले.

असोसिएशनचे उपाध्यक्ष कृष्णा उत्तेकर, सचिव अतुल वाडकर आदी उपस्थित होते. जगामध्ये रोजगार निर्मितीमध्ये दुसऱया स्थानावर असणाऱया मुद्रण क्षेत्रालादेखील इतर बाबींच्या दरवाढीचा मोठय़ा प्रमाणात फटका बसत आहे. गेल्या दोन महिन्यांत पेपरच्या किमतीमध्ये दर किलोमागे सुमारे 12 ते 15 रूपयांपर्यंत वाढ झाली आहे. या वाढीमुळे सध्याच्या किमतीमध्ये प्रिंटीग करून देणे ही व्यावसायिकांसाठी मोठी समस्या आहे. मुद्रण ही कला असून, सध्या असलेल्या समस्यांमुळे ही कला लोप पावण्याची शक्यता आहे. उच्च दर्जाची यंत्रसामग्री ही परदेशातून मागवावी लागते. सरकारने मोठय़ा प्रमाणात कर लादल्यामुळे त्याची किंमतदेखील आवाक्याबाहेर जाते. आपसूकच अशा यंत्रसामुग्रीने दर्जा सुधारतो. मात्र, त्याचे उत्पादनशुल्कदेखील मोठय़ा प्रमाणात वाढते, याकडेही त्यांनी लक्ष वेधले.

Related posts: