|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » संपादकिय / अग्रलेख » व्रजभक्त कोणाला म्हणावे?

व्रजभक्त कोणाला म्हणावे? 

गोपी श्रीकृष्णाला म्हणतात-विषमय यमुनाजलापासून, अजगररूपी अघासुरापासून, इन्दाच्या मुसळधार पावसापासून, विजेपासून, वावटळीपासून, दावानलापासून, वृषभासुरापासून, व्योमासुरापासून इत्यादी अनेकांच्या आघातापासून, भयापासून आपण आमचे वारंवार रक्षण केले आहे. तर मग कन्हैया! आज तू का रे नि÷gर झाला आहेस? जर आम्हाला मारायचेच होते तर त्या आपत्तींपासून आमचे रक्षण तरी कशाला केलेस? कृष्णा, आमचे रक्षण करण्याचे उपकार पुनः एकवार नाही का करणार? तू कालियानाग, अघासुर, बकासुर इत्यादी राक्षसांपासून आमचे रक्षण केले आहेस आणि आज या विरहासुराने आम्हाला मारायला निघाला आहेस! त्या कालिया नागाच्या विषापेक्षा सुद्धा हे विरह विष अधिक दाहक आहे. आता तर सहन होत नाही. दर्शन दे, दर्शन दे रे कन्हैया! जर आम्हाला मारायचेच होते तर आधी प्रेमदान तरी का केलेस? जर आम्हाला दर्शन दिले नाहीस तर आम्ही लोकांना सांगू की तू नंद यशोदेचा पुत्र नाहीस. आम्हाला ठाऊक आहे तू कोण आहेस ते!

कन्हैया म्हणाला-जरा मला तरी सांगा, मी कोण आहे ते. (गोपी ज्ञानीभक्त आहेत, म्हणून परमात्म्याचे स्वरूप चांगल्या प्रकारे जाणतात.) गोपी म्हणू लागल्या -आम्ही तूं कोण आहेस तें जाणतो आणि जाणूनच प्रेम करीत आहोत. (आपल्या सर्वांच्याच हृदयात अंतर्यामीच्या रूपात नारायण विराजमान आहेत. सगळय़ा शरीरधारिंच्या हृदयांत साक्षीभूत बसलेले आहेत.) कन्हैया विचारतो-काय इच्छा आहे तुम्हा सर्वांची? गोपी म्हणतात-हे कांत! अहो प्रियकरा! आपला वरदहस्त इतका शक्तिवान आहे की तो आमचा अभिमान दूर करू शकतो. आपण आपला मंगलमय हात आमच्या सर्वांच्या डोक्मयावर ठेवावा. श्रीकृष्ण म्हणतात-इतक्मया सगळय़ा गोपींमधे कोणाकोणाच्या डोक्मयावर हात ठेवू? वेळही खूप लागेल, म्हणून मी प्रथम माझ्या दुसऱया भक्तांची कामे आटोपून घेतो, मग तुम्हा सर्वांना स्पर्शलाभ देईन. गोपी म्हणतात-नाही कान्हा, त्यांचे काम नंतर कर. प्रथम आमच्यावर कृपा कर. आम्ही तुझ्या आहोत, तू आमचा आहेस. तुझ्यावर सर्वांच्या आधी आमचाच अधिकार आहे. तू व्रजजनांचा आहेस. व्रजवासियांच्या दु:खाचा नाशकर्ता आहेस. कान्हा, आपण सर्व एकाच गावाचे निवासी आहोत. म्हणून तुझ्यावर पहिला हक्क आमचा आहे. तुझा अवतारच आम्हा व्रजवासींच्या उद्धारासाठी झालेला आहे.

व्रजभक्त कोणाला म्हणावे? फक्त गोकुळ, वृंदावन, मथुरा यातच राहणाऱयांना कां? नाही, असे नाही म्हणता येत. जो नि:साधन भक्त आहे तोच व्रजभक्त आहे. साधन करीत राहून, साधनाने कधीच तृप्त न होणें हीच नि:साधनता होय. अशी भक्ती करणारा प्रत्येकजण व्रजवासी आहे. आपले पाप पर्वताएवढे आहे आणि साधना तर अल्प. सगळीच पापें कशी जळू शकतील? भगवत्कृपेनेच पापे जळतील, अशी नम्रता आली पाहिजे. सर्व प्रकारची साधने करीत राहून सुद्धा आपल्याला नि:साधन समजणारा जीवच व्रजभक्त आहे. दीन हृदयीच व्रजभक्त आहे.