|Tuesday, June 25, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात

आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

आयर्विन ख्रिश्चन हायस्कूलमध्ये बुधवारी 5 रोजी 1977 सालच्या दहावीच्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात संपन्न झाला. शिक्षणदिनाचे औचित्य साधून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी जे. आर. समुद्रे होते. मुख्याध्यापक एस. व्ही. चोकाककर यांनी प्रास्ताविक केले.

  याप्रसंगी 1977 सालच्या माजी विद्यार्थ्यांकडून शाळेला डिजीटल क्लासरूमसाठी स्क्रीन व प्रोजेक्टर देण्यात आला. यावेळी ऍड. डी. डी. धनवडे, संजय पाटील, यु. ए. बिजापूरकर, प्रदिप पाटील, प्रकाश मिसाळ यांनी शाळेतील आठवणींना उजाळा देवून शिक्षक व शाळेप्रती कृतज्ञता व्यक्त केली. यावेळी माजी विद्यार्थ्यांकडून शिक्षकांचा शाल, श्रीफळ व मानचिन्ह देवून सत्कार करण्यात आला.

  यावेळी उपमुख्याध्यापक एस. एन. सूर्यवंशी, प्रदिप कदम, आर. जी. कदम, संजय मोरे, महंमद शेख, अनिल मुसळे, अनिल गणपते, सलिम मुल्लाणी, विजय माने, अनिल बनगे, संपत चव्हाण आदी उपस्थित होते. एस. जी. जगताप यांनी आभार मानले.