|Monday, November 19, 2018
You are here: Home » आवृत्ती » बेळगांव » मुख्याध्यापिका सोलापुरे पुरस्काराने सन्मानीत

मुख्याध्यापिका सोलापुरे पुरस्काराने सन्मानीत 

प्रतिनिधी /निपाणी :

येथील प्राथमिक शाळा क्रमांक 1 च्या माजी तर पट्टणकुडी येथील सरकारी शाळेच्या मुख्याध्यापिका हिराबाई गंगाराम सोलापूरे यांना शिक्षक दिनाचे औचित्य साधून अत्युत्तम शिक्षक पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले. सदर कार्यक्रम चिकोडी येथे सार्वजनिक शिक्षण विभाग, कर्नाटक राज्य शिक्षक कल्याण निधी, बेंगळूर व उपनिर्देशक कार्यालय चिकोडी यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला होता. 

मुख्याध्यापिका सोलापूरे यांनी निपाणीतील सरकारी शाळा क्रमांक 1 मधील पटसंख्या वाढविण्यासाठी स्वखर्चातून अनेक उपक्रम राबविले आहेत. गरीब विद्यार्थ्यांसाठी त्यांनी अनेक सुविधा उपलब्ध करुन दिल्याने आज अनेक विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. शिक्षण विभागाने त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना या आधी पुरस्काराने सन्मानीत केले आहे. निपाणीतून पट्टणकुडी येथे बदली झाल्यानंतर त्यांनी आपल्या सेवेत कोणतीही कसूर ठेवली नाही. त्याची दखल घेत सदर पुरस्काराने त्यांना सन्मानीत करण्यात आले आहे.

चिकोडी येथील कार्यक्रमात आमदार महांतेश कवटगीमठ, आमदार गणेश हुक्केरी, संपादना स्वामीजी व मान्यवरांच्या हस्ते सोलापूरे यांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमास जिल्हा प्राथमिक शाळा शिक्षक संघाचे अध्यक्ष सिद्धराम लोकन्नावर, संघाचे कार्यदर्शी आर. के. कांबळे, एसीएसटी संघाचे अध्यक्ष शिंगे, जिल्हा सरकारी नोकर संघाचे उपाध्यक्ष एस. एन. बेळगावी, विश्वनाथ धुमाळ  यांच्यासह संघाचे पदाधिकारी व मान्यवर उपस्थित होते.

Related posts: