|Thursday, June 27, 2019
You are here: Home » उद्योग » ‘पॅनकार्ड’ नाही असे सांगणे पडणार महागात

‘पॅनकार्ड’ नाही असे सांगणे पडणार महागात 

वृत्तसंस्था /नवी दिल्ली :

बँकाचे व्यवहार करणे आणि त्यासाठी लागणारे पॅन कार्ड आपल्याकडे नाही असे सांगणे आता ग्राहकांना महागात पडणार आहे. कारण आता पॅन कार्ड नाही असे सांगणे आणि सरकारची दिशाभूल करणे या आरोपाखाली सरकारी पातळीवर संबंधितांना दंड आणि गुन्हा दाखल केला जाणार असल्याची माहिती सरकारी यंत्रणानी दिली आहे.

माझ्याकडे पॅनकार्ड नाही आहे, वर्षाला 2.5 लाख रुपयांपर्यतच माझे उत्पन्न आहे आणि चोरुन पोस्टात आणि खासगी ठिकाणी मुदत बंद ठेवी ठेवल्या जातात आणि सरकार यावेळी पॅनकार्ड ऐवजी 60 नंबरचा अर्ज भरुन घेते आणि गुप्तपणे करण्यात येणारे व्यवहार उजेडात न आल्याने त्याचा फटका सरकारी तिजेरीला बसण्याची शक्यता आहे. परंतु सरकारी यंत्रणेला या गोष्टीची जाणिव झाल्यानेच आता पॅनकार्ड वापराशिवाय व्यवहार करणाऱयांना आता चाप बसवण्याकरिता सरकारी पातळीवर यंत्रणा उभी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे.

एखादी व्यक्ती पॅनकार्ड नाही असे सांगत आपला वेळकाढूपणा करत असल्यास त्यांचा 60 नंबरचा अर्ज भरुन घेतला जाणार आहे. त्यांच्या सोबतच   इलेक्ट्रॉनिक अर्जही भरावा लागणार आहे. आणि करण्यात आलेल्या व्यवहाराचा तपशिलाचा उल्लेखही यावेळी करावा लागणार आहे. हा सर्व डेटा सरकारकडे जमा होणार असून बेकायदेशीरपणे व्यवहार करणाऱयाना यातून लगाम बसणार आहे. अशी माहिती सीए संगीता गुप्ता यांनी दिलेली आहे.