|Wednesday, November 21, 2018
You are here: Home » उद्योग » देशाअंतर्गत मागणी वाढल्यास स्टील कंपन्या नफ्यात येतील

देशाअंतर्गत मागणी वाढल्यास स्टील कंपन्या नफ्यात येतील 

वृत्तसंस्था /कोलकाता :

जागतिक पातळीवर व्यापार क्षेत्रात वाढत असणाऱया तणाव आणि व्यापार वृद्धीवर व घसरणीवर त्याचा होत असणारा परिणाम या बदला सोबतच आज देशाअंतर्गत बाजारात स्टीलला मागणी वाढत्यास येत्या काळात स्टील कंपन्यांना अच्छे दिन येणार असल्याचा अंदाज आयसीआरए यांनी आपल्या अहवालात मांडला आहे.

आर्थिक वर्षातील पहिल्या तिमाहीत देशातील स्टील निर्यात करण्याच्या टक्केवारीत 33 टक्के घसरण झाली आहे. आणि आयातीत 11 टक्क्यांनी वाढ दिसून आली आता दोन वर्षाच्या कालावधीनंतर रुपायात मोठी घसरण झाल्याने स्टीलचे उत्पादनात आयातीचे प्रमाणात कमी होऊन आता निर्यात करण्यात वाढ होण्याचा अंदाज मांडण्यात आला आहे.

ऑटोमोबाईल क्षेत्रात  विक्रीचे प्रमाण समाधानकारक राहील्याने आणि मान्सूनच्या अगोदर बांधकाम क्षेत्रात स्टीलला वाढती मागणी यातून पहिल्या तिमाहीत स्टीलचा खप वाढण्याच्या प्रमाणात 9.2 टक्के वाढ नोंदवण्यात आली आहे.

 ग्रामीण क्षेत्रात पायभूतसुविधावर सरकारकडून खर्च वाढवण्यात आला असून आणि  कमजोर रुपयाने देशातर्गत  स्टीलच्या किमती येत्या काळात मजबूत होणार असल्याची माहिती आयसीआरए यांनी दिली आहे.

 

 

Related posts: