|Monday, July 22, 2019
You are here: Home » उद्योग » अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक

अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक 

वृत्तसंस्था /मुंबई :

मुंबई शेअर बाजारात आज मागील दोन दिवसाच्या घसरणीच्या सत्राला ब्रेक मिळाला आहे. तर मिडकॅप आणि स्मॉलकॅप यांच्या निर्देशाकांत रिकव्हरी चांगली झाल्याचे दिसून आले.

भारतीय रुपायाने ऐतिहासिक घसरणीचा टप्पा पार केल्याने बाजारात दबावाच्या वातावरणात खरेदी झाल्याचे चित्र काही राहीले होते. बीएसईच्या मिडकॅप निर्देशाक 0.3 टक्क्यांनी वाढ होऊन तो 16,317 वर पोहोचत बंद झाला. तर निफ्टीचा मिडकॅपचा निर्देशाक 0.5 टक्के मजबूत होत 19,327 पातळीवर बंद झाला. तर स्मॉलकॅपचा निर्देशाकात 0.5 टक्क्यांनी उसळी घेत 16,804 च्या जवळपास पोहोचत बंद झाला आहे.

दिवसभरात औषध, रियल्टी, बँकेग, वीज आणि ऑईल आणि गॅस या कंपन्याचे समभागानी बाजारात जोरदार कामीगरी केली आहे. तर बँक निफ्टी 0.3 टक्क्यांच्या तेजीसह 27,468.7 पर्यत वधारत बंद झाला. आणि माध्यम, पीएसयु बँक आणि एफएमसीजी शेअर्समध्ये दबावाचे वातावरणात दिसून आले.

दिग्गज शेअर्समध्ये रिलायन्स इंडस्ट्रीज, सिप्ला, कोल इंडिया, सन फार्मा, पॉवरग्रीड, आणि अदानी पोटर्स यांचे समभाग2.8 ते 1.7 टक्क्यांनी वधारत बंद झालेत.मंनोरंजन .हिहाल्को, मारुती सुझुकी, येस बँक, बजाज फायनान्स, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक आणि एशियन पेन्टस यांचे समभाग 2.5 ते 0.3 टक्के घसरणीची नोंद करण्यात आली आहे.

बीएसईच्या 30 मुख्य शअर्सचा सेन्सेक्स 224.5 अंकाच्या वाढीसह 38,243 वर पोहचला होता. तर एनएसईच्या 50 मुख्य शअर्सचा निर्देशाकात निफ्टी 60 टक्क्यांच्या वाढ नोंदवत 11,537 ची पातळी पार केली आहे. बाजारात येत्या काही काळात आंतरराष्ट्रीय बाजारात होत असलेल्या घडामोडीमुळे बीएसई बाजारात दबावाचे वातावरणात राहणार असल्याचा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.