|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » कब्बडी स्पर्धेत शाहूपुरी विद्यालयास अजिंक्यपद

कब्बडी स्पर्धेत शाहूपुरी विद्यालयास अजिंक्यपद 

प्रतिनिधी /सातारा :

सातारा जिल्हा क्रीडा विभागातर्फे किडगाव, (ता. सातारा) येथे आयोजित करण्यात आलेल्या तालुकास्तरीय शालेय क्रीडा स्पर्धेत कब्बडी क्रीडा प्रकारात शाहूपुरी माध्यमिक विद्यालयाच्या मुलींच्या संघाने अजिंक्यपद पटकावत अभिनंदनीय कामगिरी केली.

या अत्यंत चुरशीच्या झालेल्या सामन्यांमध्ये सातारा तालुक्यातील शहरी व ग्रामीण भागातील एकूण 52 शालेय संघांनी सहभाग घेतला होता. संघनायक म्हणून अवंतिका भोसले हिने उत्तम जबाबदारी सांभाळली तिला गायत्री देवरुखकर, वैष्णवी झालटे, माधुरी खाडे, विशाखा कोळपे, प्राची कुंभार, श्रेया नलवडे या खेळाडूंनी चमकदार कामगिरी करत संघाला विजयपथावर नेले.  संघव्यवस्थापक म्हणून क्रीडा प्रशिक्षक संजय बारंगळे यांनी काम पाहिले. संघाच्या या यशाबद्दल विद्यालयात या संघातील खेळाडूंचा सत्कार करण्यात आला. विद्यालयीन पातळीवर मुलींच्या या संघास प्रशिक्षक अभय भोसले, संजय बारंगळे, परशुराम भोसले यांनी मार्गदर्शन केले. विद्यालयाच्या माजी विद्यार्थीनी व कब्बडीपट्टू प्रांजली भोसले व सावली गोसावी, प्रणाली भोसले यांनी सुध्दा स्पर्धेच्या अंतिम सामन्यापर्यत  संघास चांगले मार्गदर्शन करत प्रोत्साहन दिले.

मान्यवरांकडून होतेय कौतुक

मुलींच्या या कब्बड्डी संघाने तालुका पातळीवर अजिंक्यपद पटकावल्याबद्दल संस्था प्रशासन, शालाप्रमुख एस. एस. क्षीरसागर, माजी शालाप्रमुख एन. आर. मतकरी, पालक व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी यांनी अभिनंदन केले.

Related posts: