|Saturday, April 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » प्रत्येकांनी लोकराज्य वाचावे:जिल्हाधिकारी

प्रत्येकांनी लोकराज्य वाचावे:जिल्हाधिकारी 

प्रतिनिधी /सातारा :

माहिती व जनसंपर्क विभागाकडून प्रत्येक महिन्याला लोकराज्य विशेषांक काढण्यात येतो. लोकराज्य मासिकाच्या नियमित वाचनाने विद्यार्थ्यांचे करियर तर घडवतेच पण ते व्यक्तित्व घडविण्यासही हातभार लावते. ‘वारी’ सारखे विशेषांक तर संग्राह्य अशीच वाचन शिदोरी असल्याची भावना जिल्हाल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी बोलून दाखविली तसेच प्रत्येक महाविद्यालयीन विद्यार्थ्याकडे लोकराज्यचा अंक असला पाहिजे, असे आवाहनही त्यांनी केले.

सातारा येथील धनंजयराव गाडगीळ वाणिज्य महाविद्यालयात लोकराज्य वाचन अभियानाचा शुभारंभ जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी त्या बोलत होते. या प्रसंगी जिल्हा माहिती अधिकारी युवराज पाटील, जिल्हा कौशल्य विकास अधिकारी सचिन जाधव, महाविद्यालयाच्या प्राचार्य प्रतिभा गायकवाड, प्रा. एल.एन. घाडगे आदी उपस्थित होते.

लोकराज्य मासिक हे माहितीचा खजिना असल्याचे सांगून जिल्हाधिकारी श्वेता सिंघल पुढे म्हणाल्या. एमपीसी   तयारी करण्यासाठी लोकराज्य अंक व महाराष्ट्र वार्षिकी हे  दोन पुस्तक महत्वाचे आहेत. एमपीसी व युपसीच्या परीक्षेत या दोन अंकावर आधारित प्रश्न नेहमीच असतात. या दोन्ही परीक्षेची तयारी करणाऱया विद्यार्थ्यांनी ही दोन्ही पुस्तके घ्यावीत. ही दोन्ही पुस्तके विद्यार्थ्यांबरोबरच आपल्या कुटुंबासाठी महत्वाचे आहेत. माहिती व जनसंपर्क विभागाने वारी विशेषांक काढला त्यात आपल्या महाराष्ट्राच्या संस्कृतीचे दर्शन घडविले आहे. तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर, 13 कोटी वृक्ष लागवड असे अनेक विशेषांक काढले आहेत.

माहिती व जनसंपर्क विभागाच्या युवा माहिती दूत हा अभिनव उपक्रम सुरु करण्यात आला आहे.  या उपक्रमामुळे महाविद्यालयीन युवक-युवतींना शासन राबवित असलेल्या विविध कल्याणकारी योजनांची माहिती होणार आहे.  युवा माहिती दूत या उपक्रमाच्या माध्यमातून शासन राबवित असलेल्या योजना  जनतेपर्यंत पोहचवून त्यांना लाभ देण्याचा उद्देश असल्याने महाविद्यालयीन युवक-युवतींनी या युवा माहिती दूत उपक्रात मोठय़ा संख्येने सहभागी व्हावे, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्वेता सिंघल यांनी शेवटी केले.

Related posts: