|Friday, July 19, 2019
You are here: Home » आवृत्ती » सातारा » शिक्षकांसाठी आठवणीतील गाण्याचा कार्यक्रम

शिक्षकांसाठी आठवणीतील गाण्याचा कार्यक्रम 

प्रतिनिधी /सातारा :

मराठी मनात गेली अनेक वर्षे रुंजी घालणारी गाणी ‘सुर निरागस हो’, शांताबाई शेळकेंचे शारदा स्तवन ‘जय शारदे वागेश्वरी’, ‘सांज ए गोकुळी सावळी सावळी’  अशा अवीट गाण्यांनी पुस्तकाच्या गावातली आजची संध्याकाळ सुरमय झाली.  महाराष्ट्रातील राज्य शिक्षक पुरस्कार विजेत्या शिक्षकांसाठी पुस्तकांच्या गावातील  जननीमाता मंदीर सभागृह, पुस्तकांच गाव, भिलार, (ता. महाबळेश्वर) जि. सातारा येथे आठवणीतील गाणी या मराठी, हिंदी गाण्यांचा विशेष सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन केले होते.

 कार्यक्रमास गावातील सर्वप्रतिष्ठीत नागरिक उपस्थितीत होते. महाराष्ट्राच्या कानाकोऱयातून आलेल्या शिक्षकांसाठी पुरस्काराच्या पूर्व संध्येला हा संगीतमय कार्यक्रम तोही पुस्तकाच्या गावात केल्यामुळे शिक्षक मोठय़ा आनंदानी यात सहभागी झाल्याचे पाहायला मिळाले.