|Monday, July 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » बालकाचे अपहरण करणारा गजाआड

बालकाचे अपहरण करणारा गजाआड 

प्रतिनिधी /सोलापूर :

शहरातील गजबजलेल्या विजापूर वेशीतून बुधवारी रात्री 9.20 च्या सुमारास राजस्थानातून आलेल्या तरुणाकडून तीन वर्षाच्या मुलाच्या अपहरणाचा प्रयत्न झाला. सजग नागरिकांनी राजस्थानी तरुणाला पकडून चोप दिला. त्यानंतर त्याला पोलिसांच्या ताब्यात दिले.

सावरमल मन्नालाल (वय 21, रा. भार्गव मोहाल्ला, गाव चितवा ता. कुचमन सिटी, जिल्हा नागपूर, राजस्थान) असे राजस्थानी तरुणाचे नाव आहे. उजेर अमिर पठाण हा बुधवारी रात्री वडील डॉ. अमिर पठाण व बहिण अलीना यांच्यासह विजापूर वेस येथे आले होते. त्यांनी येथील हॉटेलात जेवणाच्या पार्सलची आर्डर देऊन ते हॉटेल बाहेर थांबले होते. तेवढय़ात आरोपी मन्नाला तिथे आला, त्याने तिथे असलेल्या गर्दीचा फायदा घेत उजेरला उचलून पुढे चालू लागला. त्याचवेळी डॉ. पठाण यांनी मन्नालाल यास हटकले. त्यावर मन्नालालने हा माझाच मुलगा असल्याचे त्यांना दरडावून सांगितले.

यावर डॉ. पठाण यांनी उजेरला त्याच्या तावडीतून सोडवण्याचा प्रयत्न केला. मात्र मन्नालालने माझाच मुलगा आहे म्हणून हट्ट धरला. दोघात सुरु असलेला शाब्दिक वाद पाहून, बाजूलाच थांबलेले लोक डॉ. पठाण यांच्या मदतीला धावून आले. त्यांनी मन्नालालच्या हातातून उजेरची सुटका केली. मात्र चिडलेल्या जमावाकडून मन्नालाल यास चांगलाच चोप देण्यात आल्याचे समजते.