|Wednesday, June 26, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » स्वीकृतवरून भाजपा पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत

स्वीकृतवरून भाजपा पदाधिकारी राजीनाम्याच्या तयारीत 

प्रतिनिधी /सांगली :

मनपा स्वीकृतच्या निवडीवरुन नाराज झालेल्या सत्ताधारी भाजपातील एका पदाधिकाऱयाने चक्क राजीनामा देण्याची तयारी दर्शवली असल्याची चर्चा गुरुवारी मनपामध्ये सुरु होती. भाजपामधील गटातटात मोठा तणाव निर्माण झाल्याने नेत्यांची मोठी गोची निर्माण झाली असून यातून मार्ग कसा काढणार याकडे लक्ष लागून आहे. मनपामध्ये प्रथमच भाजपाची सत्ता आली आहे. 78 पैकी 41 जागा भाजपाला मिळाल्या आहेत. पक्षाच्या वाटय़ाला स्वीकृतच्या 5 पैकी 3 जागा आल्या आहेत. या सदस्य निवडीसाठी सोमवारी महासभा होणार आहे.

दरम्यान, स्वीकृतसाठी भाजपामध्ये अनेकजण इच्छुक असून त्यांनी नेत्यांकडे जोरदार फिल्डींग लावली आहे. असे असले तरी मिळालेल्या माहितीनुसार भाजपाने शहरअध्यक्ष शेखर इनामदार, मिरजेतील माजी महापौर विवेक कांबळे आणि खासदार संजयकाका पाटील यांचे समर्थक रणजित सावर्डेकर यांची नावे अंतिम केल्याची चर्चा आहे. यामुळे इतर इच्छुकांमध्ये मोठी नाराजी पसरली आहे. निवडणुकीपूर्वी पक्षाने सध्या विद्यमान पदाधिकारी असलेल्या नातेवाईकास स्वीकृतपद देण्याचे आश्वासन †िदले होते. मात्र सद्या त्यांच्या नावाबाबत कोणतीही चर्चा नाही. विचारणाही केली गेली नाही.

त्यामुळे विद्यमान पदाधिकाऱयाच्या गोटात मोठी नाराजी पसरली आहे. भाजपाने दिलेले आश्वासन पाळले नाही तर या गटाच्या त्या प्रभागातील चारही नगरसेवकांनी राजीनामा देण्याची तयारी दर्शवली आहे. तशी चर्चा गुरुवारी मनपामध्ये दबक्या आवाजात सुरु होती. पक्षाने शोभेचे पद देऊन एक प्रकारे फसवणूकच केली आहे. आता पुन्हा दिलेले आश्वासन पाळले जात नाही, त्यामुळे पदावर कशाला राहायचे अशी भूमिका त्या पदाधिकाऱयाच्या गटाने घेतली असल्याचेही समजते. या पदाधिकाऱयाबरोबरच मिरज भाजपामध्येही स्वीकृतवरुन मोठी †िठणगी पडली आहे. माजी महापौर असलेल्या आणि निवडणुकीत किंगमेकरची भूमिका बजविलेल्या या पदाधिकाऱयाने एका कार्यकर्त्याचे नाव स्वीकृतसाठी पुढे केले आहे.