|Monday, April 22, 2019
You are here: Home » आवृत्ती » सांगली » निवडणूक वादातून वायफळेत खून

निवडणूक वादातून वायफळेत खून 

प्रतिनिधी /तासगाव :

ग्रामपंचायत निवडणुकीस आम्हास मदत का केली नाहीस? असे म्हणत युवक राष्ट्रवादीचे तासगाव तालुकाध्यक्ष तथा वायफळेचे ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील यांनी मंगळवारी रात्री राजेश परशुराम फाळके (वय 54) या मातंग समाजातील व्यक्तिला बेदम मारहाण केली होती. त्यांना उपचारासाठी दाखल केले असता गुरुवारी मिरज येथे उपचारादरम्यान रात्री दोन वाजता रुग्णालयात मृत्यू झाला. या मृत्यस कारणीभूत ठरल्याप्रकरणी राजेश पाटील याच्यावर खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी देण्यात आलेल्या फिर्यादीवरून संशयित आरोपीला कराडमधून तासगाव पोलिसांनी अटक केली आहे. तर युवक जिल्हाध्यक्ष भरत देशमुख यांनी पक्षातून त्याची हकालपट्टी केली. वायफळे गावात तणावाचे वातावरण होते. तर शोकाकुल वातावरणात राजेश फाळके यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले.

विश्वजित फाळके याने दिलेल्या फिर्यादीनुसार, मंगळवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास राजेश फाळके हे वायफळे आदित्य ढाब्यावर जेवण करण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी राष्ट्रवादीचा पदाधिकारी असणारा ग्रामपंचायत सदस्य राजेश पाटील एकाला घेऊन गाडी नं. एम. एच. 10, सीडी 0707 मधून आला. 2017 मध्ये झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत तुमचा समाज आमच्या पाठीशी नसल्याचे सांगत, त्याने राजेश फाळके यांना शिवीगाळ करण्यास सुरुवात केली. त्यानंतर लाथाबुक्क्यांनी मारहाण करण्यास सुरुवात केली. या मारहाणी फाळके यांच्या पोटाला गंभीर दुखापात झाली. गंभीर जखमी झाल्याचे कळताच राजेश पाटीलने तेथून पळ काढला. त्यानंतर फाळके यांना त्यांच्या नातेवाईकांनी तात्काळ सांगली येथील शासकीय रुग्णालयात दाखल केले. त्यांच्यावर उपचार सुरु असतानाच बुधवारी रात्री अडीच वाजण्याच्या सुमारास राजेश फाळके यांचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. याबाबत राजेश पाटील याच्याविरोधात खून आणि ऍट्रॉसिटीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Related posts: