|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » कोल्हापुर » सराईत टोळीकडूनच गव्याची शिकार

सराईत टोळीकडूनच गव्याची शिकार 

प्रतिनिधी /कोल्हापूर :

राधानगरी अभयारण्य क्षेत्रात खेडगे (ता. भुदरगड) नजीक झालेली गव्याची शिकार मांसविक्रीसाठीच सराई टोळीकडून झाल्याचे प्राथमिक तपासात स्पष्ट झाले आहे.  शिकारीसाठी बंदुकीचा वापर झाला असल्याची शक्यता व्यक्त होत आहे. दरम्यान, मृत गव्याचे अवशेष गुरुवारी मुंबई येथील फोरेन्सिक लॅबला पाठवण्यात आले. परिसरातील बंदुकांचा तपासणी करा, त्याचा सात दिवसांत अहवाल द्या, असे आदेश उपवनसंरक्षक एच. जी. धुमाळ यांनी गुरुवारी दिले.

   याप्रकरणी उपवनसंरक्षक धुमाळ म्हणाले, राधानगरी अभयारण्यात मिळालेल्या अवशेषावरून मांसविक्रीसाठीच गव्याची शिकार झाल्याचे समोर येत आहे. गव्याच्या शिकारीचा हा पहिलाच प्रकार उघडकीस आला आहे; पण यातून यापूर्वीही या क्षेत्रात गव्याच्या शिकारी झाल्या असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने वन विभाग तपास करत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

सराईत टोळीचे कृत्य

  भुदरगड तालुक्यात खैराच्या लाकडाची तस्करी, चोरटी वाहतूक करताना वन विभागाने एका टोळीला अटक केली होती.तसेच लाकडासह टेम्पोही जप्त केला होता. सात जणांच्या या टोळीने वनाधिकाऱयांवर दबाव टाकण्यासाठी गव्याच्या शिकारीचा प्रकार केला असावा, अशी शक्यता होती; पण वस्तुस्थिती पाहता हा
प्रकार समोर आलेला नाही. गव्याची शिकार मुलतः शिंग, खुरांसाठी केली जाते. त्यासाठी विषप्रयोग करून गव्याची शिकार करणाऱया टोळय़ाही आहेत. येथे गव्याच्या खुर, शिंगांना धक्का लागलेला नाही, पण गव्याच्या मांसाची मात्र चोरी झाली आहे. त्यामुळे मांसविक्रीसाठीच सराईत टोळीने या गव्याची शिकार केल्याचे धुमाळ यांनी सांगितले.