|Saturday, July 20, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » गोवा कृषीपणन मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश वेळीप बिनविरोध

गोवा कृषीपणन मंडळाच्या अध्यक्षपदी प्रकाश वेळीप बिनविरोध 

प्रतिनिधी /मडगाव :

गोवा कृषीपणन मंडळाच्या अध्यक्ष व उपाध्यक्षांची निवड करण्यासाठी काल गुरूवारी कृषीपण मंडळाच्या संचालक मंडळाची पहिली बैठक झाली. अध्यक्षपदासाठी प्रकाश शंकर वेळीप तर उपाध्यक्ष पदासाठी प्रेमानंद म्हांबरे यांचे अर्ज आल्याने दोघांची बिनविरोध निवड झाली.

अध्यक्षपदी निवड झाल्यानंतर दै. तरूण भारतशी बोलताना प्रकाश शंकर वेळीप म्हणाले की, शेतकऱयांचे हित जपण्यासाठी कृषीपण मंडळाचे संचालक प्रयत्न करणार आहे. त्याच बरोबर कृषीपणन मंडळाचा कारभार पारदर्शक असेल यावर देखील भर दिला जाईल.

गोवा कृषीपणन मंडळावर आपली पहिल्यादाच निवड झाली असली तरी आपण सहकार्य क्षेत्रात असल्याने हा अनुभव आपण गोवा कृषीपणन मंडळाच्या माध्यमांतून शेतकऱयांच्या हितासाठी वापरात आणीन, शेतकऱयांच्या समस्या समजून घेऊन त्यावर तोडगा काढला जाईल असे प्रकाश वेळीप म्हणाले.