|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » आवृत्ती » गोवा » राष्ट्रीय महामार्ग 3 सी अधिसूचनेस जमीन मालकांचा विरोध

राष्ट्रीय महामार्ग 3 सी अधिसूचनेस जमीन मालकांचा विरोध 

प्रतिनिधी /म्हापसा :

राष्ट्रीय महामार्ग 3 सी अधिसूचना जारी करण्याबाबत ज्या नागरिकांची जमीन राष्ट्रीय महामार्ग लागूनच आहे वा ज्यांची जमीन या योजनेंतर्गत जाते त्यांना नोटीसी बजावून म्हापसा राष्ट्रीय महामार्गचे जबाबदार अधिकारी एस. पी. सिगणापूरकर यांनी बोलविले होते. याबाबत नागरिकांची कागदपत्राची पडताळणी करण्यासाठी व जमिनी ताब्यात घेण्यासाठी कागदपत्रे देण्यासंदर्भात येथे सर्वांना बोलावण्यात आले असता यावेळी बराच गोंधळ माजला. राष्ट्रीय महामार्ग सहा पदरी व पूल चार पदरी असल्याचे अधिकारी वर्गांनी अधिकारी वर्गांनी सांगितल्यावर जमीन मालकांनी त्यास आक्षेप घेतला व कागदपत्रे दाखविण्यास नकार दिला. काही जमीन मालकांनी 3 सी अधिसूचना विरोधात न्यायालयात धाव घेण्याचा निर्णय घेतला आहे.

म्हापसा बोडगेश्वर मंदिराच्या सभागृहात ही बैठक बोलाविण्यात आली होती. व्यासपीठावर उपस्थित अधिकाऱयांनी, 3 सी द्वारे राष्ट्रीय महामार्गावरील पूल चारपदरी तर महामार्ग सहा पदरी असल्याचे सांगताच उपस्थित जमीन मालकांनी त्यास आक्षेप घेतला. पर्वरी येथील चोडणकर नर्सिंग होमचे डॉ. रवींद्र चोडणकर, एक्युपंचरचे डॉ. प्रभू, म्हापसा बोडगेश्वर शेतकरी संघटनेचे अध्यक्ष संजय बर्डे, पर्वरी येथील किशोर अस्नोडकर, भंडारी समाजाचे नेते देवानंद नाईक, अश्विन गॅरेज पर्वरी आदी जमीन मालकांनी यावेळी तीव्र हरकत घेतली व यास पूर्णतः विरोध असल्याची माहिती दिली.

फातिमा डिसा यांनी 3सी अधिसूचनेस आपला विरोध असल्याचे सांगून तसे लेखीही अधिकाऱयांना दिले. त्यानंतर सर्वांनी विरोध दर्शवत लेखी पत्र अधिकारी वर्गाला दिले. प्रा. एडवर्ड डिलीमा यांनी जमिनीचे नेमके काय करणार?, प्रक्रिया काय आहे? हे उपस्थित अधिकाऱयांना माहीत नसल्याचा आरोप त्यांनी केला.