|Tuesday, February 18, 2020
You are here: Home » Top News » दाऊदच्या मुसक्या आवळणार

दाऊदच्या मुसक्या आवळणार 

ऑनलाईन टीम / मुंबई :

कुप्रसिद्ध अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमला अटक करण्याच्या हालचालींना वेग आला आहे. कारण, भारत आणि अमेरिका यांच्यात झालेल्या द्विपक्षीय चर्चेत दाऊद इब्राहिमला अटक करण्यासाठी अमेरिकेने मदत करण्याचे कबूल केले आहे. त्यासाठी सर्च ऑपरेशन राबविण्यास अमेरिकेने सहमती दर्शवली आहे. त्यामुळे आता, भारत आणि अमेरिका एकत्र येऊन दाऊदच्या मागावर असणार आहेत.

दाऊद हा भारतासाठी मोस्ट वाँटेड असून मुंबईतील 1993 च्या बॉम्बस्फोटाचा तो म्होरक्मया आहेत. त्यामुळेच 2003 मध्ये त्याला आंतरराष्ट्रीय दहशतवादी म्हणून घोषित करण्यात आले आहे. विशेष म्हणजे अमेरिकेने दाऊदवर 25 लाख डॉलर्सचे बक्षीसही लावले आहे. भारताने केलेल्या प्रयत्नांमुळेच युएई आणि ब्रिटनमधील त्याच्या संपत्तीवर टाच आणण्यास मदत झाली आहे. मात्र, अमेरिकेचे डोनाल्ड ट्रम्प सरकार भारताच्या मोदी सरकारला दाऊदला पकडून देण्यासाठी मदत करणार आहे. त्यामुळे लवकरच दाऊद भारतीय तपास यंत्रणांच्या हाती लागण्याची शक्मयता वर्तविण्यात येत आहे.

Related posts: