|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » दीपाली सय्यद शिवसंग्राममध्ये

दीपाली सय्यद शिवसंग्राममध्ये 

ऑनलाईन टीम / पुणे

शिवसंग्रामप्रणित भारतीय संग्राम परिषदेचा मेळावा येत्या मंगळवारी दुपारी 4 ते 7 दरम्यान सहकारनगर शिवदर्शन येथील राजीव गांधी ई लर्निंग स्कूलच्या सभागृहात होणार आहे. या मेळाव्याच्या अध्यक्षस्थानी शिवसंग्रामचे राष्ट्रीय अध्यक्ष आमदार विनायक मेटे राहणार असून, अभिनेत्री दीपाली सय्यद यांच्यासह इतर पक्षातील अनेक नेते व पदाधिकारी पक्षप्रवेश करणार असल्याची माहिती शहराध्यक्ष भरत लगड यांनी पत्रकार परिषदेत दिली.

मेळाव्यात शिवसंग्रामच्या आमदार डॉ. भारती लव्हेकर, प्रदेशाध्यक्ष तानाजी शिंदे, युवक प्रदेशाध्यक्ष राजेंद्र मस्के, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष शैलेश सरकटे आदींसह इतर पदाधिकारी उपस्थित असतील. मराठा आरक्षणाविषयी शिवसंग्राम आणि विनायक मेटे हे गेल्या अनेक वर्षांपासून लढा देत आहेत. याविषयीची पुढील भूमिका मेळाव्यात मांडण्यात येणार आहे. तसेच अरबी समुद्रातील छत्रपती शिवाजी महाराजांचे स्मारक आणि इतर विषयांसंदर्भातदेखील मार्गदर्शन व चर्चा होणार आहे. मेळावा सर्वांसाठी खुला आहे, असे या वेळी सांगण्यात आले.