|Thursday, July 18, 2019
You are here: Home » Top News » लक्ष्मी विलास बँकेने भारतातील नागरिकांसाठी केला ‘आधार नोंदणी केंद्रां’चा विस्तार

लक्ष्मी विलास बँकेने भारतातील नागरिकांसाठी केला ‘आधार नोंदणी केंद्रां’चा विस्तार 

ऑनलाईन टीम / चेन्नई :

 “लक्ष्मी विलास बँकेच्या  55 हून अधिक शाखांनी आधार नोंदणी व सुधारणा सेवा केंद्र स्थापन केले आहे. ग्राहकांना या सेवा केंद्रांमध्ये, प्रमाणित नोंदणी एजंटच्या मदतीने, नवे आधार कार्ड तयार करण्याची किंवा जुन्या आधार कार्डामध्ये बदल करण्याची सेवा ग्राहकांना मिळणार आहे.

हा उपक्रम बँकेच्या ग्राहकांना व अन्य व्यक्तींना सेवा देण्यासाठी सुरू करण्यात आला आहे. सर्वोत्तम दर्जाच्या बँकिंग सेवा देणे, तसेच विविध प्रकारच्या सुरक्षित सुविधांशी आपली माहिती जोडण्यास मदत व्हावी म्हणून प्रत्येक व्यक्तीला विशेष ओळख प्राप्त करून देण्याच्या सरकारच्या उपक्रमाला पाठिंबा देणे, या हेतूने हा उपक्रम हाती घेतला आहे. नजिकच्या एलव्हीबी आधार कार्ड नोंदणी सेवा केंद्राची माहिती घेण्यासाठी व सेवांचा लाभ घेण्यासाठी एलव्हीबीच्या कोणत्याही शाखेशी संपर्क साधा किंवा www.lvbank.com पाहा.”