|Monday, October 15, 2018
You are here: Home » Top News » अकोला आयुक्तांकडून मनपा कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई

अकोला आयुक्तांकडून मनपा कर्मचाऱयांवर निलंबनाची कारवाई 

ऑनलाईन टीम / अकोला

शहरातील मालमत्ताधारकांजवळून थकीत मालमत्ता कर वसुली करण्यात अपयशी ठरलेल्या कर विभागातील सहा कर्मचाऱयांना महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी तडकाफडकी निलंबित केले. मनपाच्या मुख्य सभागृहात कर वसुलीचा आढावा घेत असताना या विभागातील काही कर्मचारी कामचुकारपणा करीत असल्याचे आयुक्त वाघ यांच्या निदर्शनास आल्यानंतर त्यांनी ही कारवाई केली.

महापालिका प्रशासनाने मालमत्तांचे पुनर्मूल्यांकन केल्यानंतरही अपेक्षित वसुली होत नसल्याचे चित्र आहे. शहरातील मालमत्ताधारकांकडे आजरोजी तब्बल 41 कोटींचा कर थकीत आहे. ही थकबाकी वसूल करण्यासाठी मनपाच्या कर विभागाकडे 35 वसुली लिपिक कार्यरत आहेत. वसुली लिपिकांच्या कामकाजाचा महापालिका आयुक्त जितेंद्र वाघ यांनी गुरुवारी आढावा घेतला असता अत्यल्प वसुली केली जात असल्याचे त्यांच्या निदर्शनास आले.

यासंदर्भात जाब विचारला असता वसुली लिपिक समाधानकारक उत्तर देऊ शकले नाहीत. ही बाब पाहता आयुक्त वाघ यांनी सहायक अधीक्षक राजेंद्र गाडगे, वसुली लिपिक किरण शिरसाट, ईश्वर नरडे, संतोष साबळे, राहुल देशमुख, ज्ञानेश्वर देशमुख यांना निलंबित करण्याचा आदेश जारी केला.  

Related posts: