|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » जळगावात एटीएसची कारवाई, एक जण ताब्यात

जळगावात एटीएसची कारवाई, एक जण ताब्यात 

ऑनलाईन टीम / जळगाव :

दहशतवादी विरोधी पथकाने जळगाव जिह्यातील साकळी गावातून एका युवकाला ताब्यात घेतलं आहे. या तरुणाला पुढील चौकशीसाठी मुंबईला नेल्याची माहिती एटीएसने तरुणाच्या नातेवाईकांना दिली. पथकाने या युवकाच्या घराची जवळपास अडीच ते तीन तास झाडाझडती घेतली. कोणत्या प्रकरणाबाबत एटीएसने कारवाई केलीय, याची प्रचंड गोपनीयता एटीएसने बाळगली आहे.

शिवाय त्याच्या घरातून पथकास काय आक्षेपार्ह आढळले याची माहिती पथकाने दिली नाही. एटीएसनं ताब्यात घेतलेल्या युवकाचा दुचाकीचा व्यवसाय असल्याची माहिती आहे. एटीएसच्या कारवाईचे हे वृत्त हळूहळू साकळीसह यावल तालुक्मयात समजताच अनेक तर्कवितर्क लढवले जात आहेत. या तरुणाला कोणत्या प्रकरणात ताब्यात घेतले असावे, इतक्मया वेळ बंद घरात काय चौकशी आणि पाहणी केली, असे अनेक प्रश्न अनुत्तरीत आहेत. ज्या तरुणाला ताब्यात घेतले आहे, तो मूळचा रमुक्ताईनगर तालुक्मयातील कर्की येथील हिवासी आहे. त्याचे मोटारसायकल गॅरेज आहे.