|Saturday, April 20, 2019
You are here: Home » Top News » सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्प

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठात सौरऊर्जा प्रकल्प 

ऑनलाईन टीम / पुणे

देशभरात सौरऊर्जेचा वापर करणारे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठ हे पहिले विद्यापीठ ठरले आहे. ग्रीन एनर्जी मिशनमध्ये पुणे विद्यापीठाने पुढाकार घेतला आहे. एकूण चौदा इमारतींवर सौरऊर्जा प्रकल्प कार्यान्वित करण्यात येणार असून, पहिल्या टप्प्यात सहा इमारतींसाठी सौरऊर्जा प्रकल्प सुरु करण्यात आला आहे, अशी माहिती कुलगुरु डॉ. नितीन करमळकर यांनी दिली.

सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठातील सौरऊर्जा प्रकल्पाचे उद्घाटन कुलगुरू डॉ. करमळकर यांच्या हस्ते करण्यात आले. त्या वेळी ते बोलत होते. प्र-कुलगुरू डॉ. एन. एस. उमराणी, कुलसचिव डॉ. अरविंद शाळिग्राम उपस्थित होते. विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत 602 किलोवॅट पीट क्षमतेच्या सौरऊर्जा प्रकल्पाचे कामकाज पाहिले जात आहे. या प्रकल्पाविषयी माहिती देताना आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागाचे संचालक डॉ. संदेश जाडकर म्हणाले, या प्रकल्पासाठी विद्यापीठ आवारातील सर्व इमारतींचे निरीक्षण करण्यात आले. त्यामधील 14 इमारतींवर हा प्रकल्प सुरू करण्यात येत आहे. दुसऱया टप्प्यात पुढील सात इमारतींवर हा प्रकल्प 20 सप्टेंबर 2018 पर्यंत काया<न्वित केला जाईल. अक्षय आणि नवीकरणक्षम ऊर्जा विभागाच्या वतीने विद्यापीठातील आंतरशाखीय ऊर्जा अभ्यासप्रणाली विभागांतर्गत हा एकूण 602 किलोवॅट पीट क्षमतेचा हा प्रकल्प आहे. या प्रकल्पामुळे विद्यापीठ आवारातील ऊर्जेच्या गरजेतील 35.5 लाख इतक्मया रकमेच्या विजेची दरवषी बचत होणार आहे. यामधून अंदाजे 8 लाख 72 हजार 900 किलोवॅट इतकी ऊर्जा वाचेल, अशी अपेक्षा आहे. यामुळे पुढील 25 वर्षांसाठी प्रतिवर्ष 716 टन कार्बन उत्सर्जन कमी करण्यास सहाय्य मिळणार आहे. कमी होणाऱया कार्बन उत्सर्जनाचा विचार करता हा प्रकल्प म्हणजे सुमारे 17 हजार 420 इतक्मया वृक्षांची लागवड करण्यासारखेच आहे, अशी या प्रकल्पाची वैशिष्टय़े आहेत.

Related posts: