|Tuesday, June 18, 2019
You are here: Home » Top News » पुण्यात ‘कॉर्निया, आय बँकिंग’ राष्ट्रीय परिषद एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलतर्फे आयोजन

पुण्यात ‘कॉर्निया, आय बँकिंग’ राष्ट्रीय परिषद एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलतर्फे आयोजन 

ऑनलाईन टीम / पुणे

पीबीएमएच्या एच.व्ही.देसाई आय हॉस्पिटलतर्फे पुण्यात मगरपट्टा समोरील सुझलॉन हॉलमध्ये 8, 9 सप्टेंबर रोजी आय बँक असोसिएशन ऑफ इंडियाच्या ‘कॉर्निया व आय बँकींग’ या विषयावर राष्ट्रीय परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे. पुना ऑप्थॉलमोलॉजिकल सोसायटी व महाराष्ट्र ऑप्थॉलमोलॉजिकल सोसायटी यांच्या संयुक्त विद्यमाने या परिषदेचे आयोजन करण्यात आले आहे.

देसाई आय हॉस्पिटलने बी.जे. मेडिकल कॉलेज व ससून हॉस्पिटलशी सहयोग केला आहे. भारतात दरवर्षी प्रत्यारोपण करता येईल अशा 2 लाख टिश्यूजची गरज आहे. 2017-18 मध्ये कॉर्निअल टिश्यूजची दात्यांकडून झालेली पुर्नप्राप्ती 57138 आहे. म्हणजे 28500 दाते आहेत. मात्र खरी गरज 1 लाख दात्यांची आहे. ही दरी भरून काढण्यासाठी नेत्रदानाविषयी जनजागृतीची गरज आहे. आय बँकींगमधील कर्मचारी व नेत्रतज्ञांना अद्ययावत आंतरराष्ट्रीय पद्धतींच्या कौशल्याबाबत अवगत करणे आहे. ही परिषद अशाच कार्यक्रमाचा एक भाग असून यामध्ये वैद्यकीय प्रशिक्षण, माहितीसाठय़ाचे संकलन, वैद्यकीय मापदंड, नेटवर्किंग, रिट्रिव्हल्स, टिश्यू शेअरिंग व सर्जिकल कपॅसिटी अशा अनेक विषयांवर राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय तज्ञ मार्गदर्शन करणार आहेत.