|Monday, November 12, 2018
You are here: Home » उद्योग » युनियन बँकेला 1 कोटीचा दंड

युनियन बँकेला 1 कोटीचा दंड 

वृत्तसंस्था/ मुंबई

युनियन बँक ऑफ इंडियाला 1 कोटी रुपयांचा दंड भारतीय रिझर्व्ह बँकेकडून भरण्याची सूचना देण्यात आली. बँकेने आपल्या शाखेमध्ये झालेल्या घोटाळय़ांचा शोध न घेणे आणि त्याची तक्रार वेळेत न दिल्याने ही कारवाई करण्यात आली. बँकिंग नियमावली कायद्यानुसार आरबीआयला काही अधिकार देण्यात आले आहेत. या कायद्याचा आधार घेत मध्यवर्ती बँकेकडून ही कारवाई करण्यात आली असे सांगण्यात आले.

आरबीआयने युनियन बँकेला 15 जानेवारी 2018 रोजी कारणे द्या नोटीस पाठविली होती. यानंतर बँकेने 1 फेब्रुवारी रोजी प्रत्युत्तर दिले होते, तर आरबीआयच्या व्यवस्थापकीय संचालक समितीसमोर 14 एप्रिल रोजी आपली तोंडी बाजू मांडली होती.

बँकेकडून सादर करण्यात आलेल्या उत्तरामध्ये योग्य कारण मिळत नसल्याने ही कारवाई करण्यात आली. बँकेच्या आकारमानानुसार हा दंड आकारण्यात आलेला नाही. भविष्यात अशा घटना होऊ नयेत याची काळजी घेण्यासाठी अंतर्गत प्रणाली मजबूत करण्यात आल्याचे युनियन बँकेकडून सांगण्यात  आले.

Related posts: