|Wednesday, July 17, 2019
You are here: Home » उद्योग » एअर इंडियाच्या उपकंपनीच्या विक्रीसाठी पुढाकार

एअर इंडियाच्या उपकंपनीच्या विक्रीसाठी पुढाकार 

एआयएटीएसएलच्या विक्रीसाठी सरकारचे प्रयत्न

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

एअर इंडियाची उपकंपनी असणाऱया एअर इंडिया एअर ट्रान्स्पोर्ट सर्व्हिसची (एआयएटीएसएल) विक्री करण्याची तयारी सरकारकडून करण्यात येत आहे. या कंपनीच्या विक्रीने सरकारला निधी उभारण्यास आणि कंपनीकडील कर्जाचे ओझे कमी करण्यास मदत होणार आहे. एआयएटीएसएल ही कंपनी विमानतळावरील सेवा देण्याचे काम करते. सरकारकडून या कंपनीची रणनितीक विक्री करण्यात येणार आहे.

अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखालील समितीने जूनमध्ये एअर इंडियाला अधिक स्पर्धात्मक करणे आवश्यक असल्याचे म्हटले होते. यासाठी स्थावर संपत्ती आणि अन्य उपकंपन्यांचा लिलाव करण्याचा प्रस्ताव मांडला होता. या वर्षाच्या सुरूवातीला एअर इंडियातील 76 टक्के हिस्सा विक्रीसाठी पुकारण्यात आलेल्या लिलावाला कोणीही बोली न लावल्याने यासंदर्भात पुन्हा विचार करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

2016-17 च्या आकडेवारीनुसार एआयएटीएसएल आणि एअर इंडिया एक्स्प्रेस लिमिटेड या दोन्ही उपकंपन्या नफ्यात आहेत. या दोन्ही कंपन्यांना गेल्या आर्थिक वर्षात अनुक्रमे 61.66 कोटी रुपये आणि 2.97 अब्ज रुपयांचा नफा झाला आहे. एआयएटीएसएलची स्थापना जून 2003 मध्ये करण्यात आली असून विमानतळावरील सर्व सेवा देण्याचा काम या कंपनीकडे असून एअर इंडियाकडे 100 टक्के हिस्सा आहे. ही कंपनी दुरुस्ती, देखभाल, सर्व्हिसिंग, इंजिनांचे रिफर्बिशिंग अशा प्रकारचे काम करते.