|Monday, November 12, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » हार्दिकची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल

हार्दिकची तब्येत बिघडली, रुग्णालयात केले दाखल 

अहमदाबाद

 गुजरातमध्ये पाटीदार आरक्षण आणि शेतकऱयांच्या कर्जमाफीच्या मागणीसाठी 14 दिवसांपासून उपोषण करणाऱया पाटीदार नेते हार्दिक पटेलची प्रकृती बिघडल्याने त्याला रुग्णालयात हलविण्यात आले आहे. हार्दिकने 25 ऑगस्ट रोजी उपोषणास प्रारंभ केला होता. उपोषणास 10 दिवस पूर्ण झाल्यावर प्रकृती बिघडू लागल्याने हार्दिकला चालण्यासाठी व्हिलचेअरचा वापर करावा लागत होता.

शुक्रवारी दुपारी हार्दिकची प्रकृती बिघडल्यानंतर त्याला अहमदाबादच्या सोला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. हार्दिकला रुग्णालयात नेल्यानंतर तेथे मोठय़ा संख्येत पोलीस दल तैनात करण्यात आले आहे. याचबरोबर हार्दिकचे शेकडो समर्थक देखील रुग्णालयाबाहेर एकवटले आहेत. हार्दिकच्या प्रकृतीबाबत रुग्णालयाकडून कोणतीही अधिकृत माहिती देण्यात आलेली नाही.

राज्यातील भाजप सरकारने मंगळवारी रात्री पाटीदार समुदायाच्या अनेक नेत्यांसोबत बैठक घेतली होती. सरकाने मागण्यांवर विचार केल्यास उपोषण संपुष्टात आणू असे हार्दिकने बुधवारी जाहीर केले होते. सरकारने मागण्या मान्य न केल्याने हार्दिकने गुरुवारपासून पाणी देखील सोडले आहे.

Related posts: