|Saturday, April 20, 2019
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » काँग्रेसकडून ‘राहुल यात्रे’चा पुरावा

काँग्रेसकडून ‘राहुल यात्रे’चा पुरावा 

काँग्रेस अध्यक्ष कैलास यात्रेवर : 34 किलोमीटर केली पायपीट

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

राहुल गांधी यांच्या कैलास यात्रेचा ‘पुरावा’ काँग्रेसने उपलब्ध केला आहे. पक्षाकडून शुक्रवारी कैलास पर्वतासमोरील राहुल यांचे छायाचित्र आणि त्यांच्या फिटनेस वॉचचे आकडे प्रसिद्ध करण्यात आले. कैलास यात्रेदरम्यान राहुल यांनी सुमारे 34 किलोमीटर पायपीट केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

राहुल यांनी कैलास मानसरोवरची छायाचित्रे प्रसारित केली होती. ही छायाचित्रे बनावट असल्याचा आरोप समाजमाध्यमांवर झाला होता. राहुल यांच्या कैलास यात्रेची छायाचित्रे शुक्रवारी समोर आली आहेत. यात ते अन्य भाविकांसोबत दिसून आले. राहुल गांधी यांच्या यात्रेची एक चित्रफित देखील प्रसारित करण्यात आली.

राहुल यांचा पायी प्रवास

भाजप नेत्यांकडून राहुल गांधी यांच्या यात्रेबद्दल संशय व्यक्त करण्यात आल्यानंतर काँग्रेसने स्वतःच्या ट्विटर हँडलद्वारे राहुल गांधी यांच्या छायाचित्रांसोबत यात्रेचा तपशील देखील मांडला आहे. द्वेषवृत्ती बाळगणाऱयांना मागे टाकत राहुल गांधी यांनी कैलास यात्रेदरम्यान चांगला वेग पकडल्याचे काँग्रेसने म्हटले. राहुल यांनी सुमारे 35 किलोमीटर पायी प्रवास केला, ही यात्रा त्यांनी 463 मिनिटांत (सुमारे 7 तास) पूर्ण केल्याचे काँग्रेसकडून सांगण्यात आले.

कैलासानेच बोलावले आहे!

राहुल यांनी स्वतःच्या ट्विटर हँडलवर कैलास यात्रेच्या छायाचित्रानंतर एक चित्रफित प्रसारित केली आहे. ‘शिव ब्रह्मांड आहे’ असे त्यांनी ट्विटरवर म्हटले आहे. तत्पूर्वी राहुल यांनी यात्रेतील आध्यात्मिक अनुभव मांडले होते. कैलासाने बोलाविले असेल तरच कोणतीही व्यक्ती तेथे जाऊ शकते, असे ते म्हणाले होते.

 

Related posts: