|Saturday, December 15, 2018
You are here: Home » राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय » चोक्सीबद्दल इंटरपोलचा निर्णय ऑक्टोबरमध्ये

चोक्सीबद्दल इंटरपोलचा निर्णय ऑक्टोबरमध्ये 

रेड कॉर्नर नोटीसचा मुद्दा : भारताच्या अर्जावर होणार सुनावणी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

फरार उद्योजक मेहुल चोक्सीने रेड कॉर्नर नोटीसबद्दल केलेल्या अर्जावर इंटरपोल पुढील महिन्यात निर्णय घेणार आहे. फ्रान्सच्या लियोनमध्ये इंटरपोल समिती रेड कॉर्नर नोटीसबद्दल ऑक्टोबरमध्ये निर्णय जाहीर करेल. चोक्सीच्या विरोधात रेड कॉर्नर नोटीस बजावण्यात यावी याकरता भारतीय तपास यंत्रणांनी अर्ज केला आहे.

चोक्सी अमेरिकेतून फरार झाल्याची माहिती इंटरपोलने जुलैमध्ये दिली होती. भारतीय यंत्रणांनी चोक्सीच्या विरोधात ठोस पुरावे जमविले आहेत. तर खटला राजकीय कटांतर्गत दाखल करण्यात आल्याचा दावा चोक्सीने केल्याने भारताच्या मागणीवर इंटरपोलने निर्णय राखून ठेवला होता. तसेच चोक्सीने भारतीय तुरुंगांच्या खराब स्थितीचा दाखला दिला होता.

घोटाळय़ाचा सूत्रधार

मेहुल चोक्सी भारतातील सुमारे 2 अब्ज डॉलर्सच्या घोटाळय़ाचा सूत्रधार आहे. इंटरपोलची 5 सदस्यीय समिती याप्रकरणी निकाल देणार आहे. दोन्ही बाजूंचा युक्तिवाद ऐकल्यावरच ही समिती रेड कॉर्नर नोटीसबद्दल निर्णय देणार आहे. इंटरपोलने चोक्सीचा भाचा आणि या घोटाळय़ात सहभागी नीरव मोदीच्या विरोधात अगोदरच रेड कॉर्नर नोटीस बजावली आहे. नीरव मोदी चालू वर्षाच्या प्रारंभी भारतातून पळाला होता. सध्या तो ब्रिटनमध्ये असल्याची माहिती आहे.

प्रत्यार्पणासाठी प्रयत्न

नीरव मोदी ब्रिटनमध्ये असल्याचे समजल्यानंतर भारताने त्याच्या प्रत्यार्पणाचे प्रयत्न चालविले आहेत. मेहुल चोक्सी सध्या अँटिग्वा आणि बारबुडा येथे असून त्याने तेथील नागरिकत्व प्राप्त केले आहे. चोक्सीने नियोजनपूर्वक पलायन केल्याचे समोर आले आहे.

Related posts: